वृत्तसंस्था/ डर्बी (लंडन)
इंग्लीश कौंटी क्रिकेट स्पर्धेत ससेक्स क्रिकेट क्लबकडून खेळताना भारताचा कसोटीवीर फलंदाज चेतेश्वर पुजाराने शानदार नाबाद द्विशतक (201) झळकविले. ससेक्स आणि डर्बीशायर यांच्यातील हा सामना अखेर अनिर्णीत राहिला.
इंग्लीश कौंटी चॅम्पियनशीप डिव्हिजन-2 मधील या सामन्यात रविवारी चेतेश्वर पुजाराने दुसऱया डावात 387 चेंडूत नाबाद 201 धावा झळकविल्या. पुजारा आणि ससेक्स संघातील टॉम हेन्सने 119 षटकांत 351 धावांची भागिदारी केली. हेन्सने द्विशतक झळकविले. पुजाराने भारतातर्फे 95 कसोटीत 43.87 धावांच्या सरासरीने 6713 धावा जमविताना 18 शतके आणि 32 अर्धशतके नोंदविली आहेत. पुजाराने पाच वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.









