मलेशियातील ग्लोबल सीएफओ समिट मध्ये डॉ. चेतन नरके यांची निवड
क्वालालंपूर येथे तीन ते पाच ऑक्टोबर दरम्यान आयोजन
कोल्हापूर : प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट वर्ल्ड इंटेलीजन्स द वेस्टीनच्यावतीने ३ ते ५ ऑक्टोबर दरम्यान मलेशियातील क्वालालंपूर येथे ग्लोबल सीएफओ समिटचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मार्गदर्शन करणाऱ्या जगातील ५० वक्त्यांमध्ये भारतातील डॉ. चेतन नरके यांची निवड करण्यात आली आहे. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात जगातील प्रमुख बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सीएफओ सहभागी होणार आहेत.ज
गभरातील अर्थकारण आणि व्यापाराची समीकरणे बदलत आहेत. अशावेळी सीएफओंची भूमिका हि केवळ वित्त नियोजन आणि लेखा परीक्षण एवढीच राहत नसून मनुष्यबळ विकास, व्यावसायिक नियोजन आणि व्यवस्थापन, उत्पादन, विपणन, जाहिरात, अशा सर्वच घटकात सीएफओंच्या कामाला आणि भूमिकेला महत्व प्राप्त झाले आहे. या आणि अशा विविध विषयावर या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे. येणाऱ्या काळात सीएफओंना कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे ? त्यांच्याकडून कशी कार्य पद्धती अपेक्षित आहे ? या विषयावर डॉ चेतन नरके मार्गदर्शन करणार आहेत.
डॉ चेतन नरके हे आशियातील नामांकित अर्थतज्ञ असून सहकार आणि बँकिंग क्षेत्रातील तज्ञ म्हणून ओळखले जातात. सध्या ते थायलंडच्या वित्त मंत्रालयाचे वाणिज्य सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या सह डॉ. रिक गुडमॅन, पास्कल बॉर्नेट, झेविअर आन्द्रे जुस्तो, पूजा सुन्द असे जागतिक कीर्तीचे तज्ञ या समिट मध्ये मार्गदर्शन करणार आहेत.