बेळगाव : मजगाव येथील गोमटेश विद्यााrपठ स्कूल आयोजित सार्वजनिक शिक्षण खात्याच्या टिळकवाडी माध्यमिक विभागीय मुला-मुलींच्या योगा व बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात झाल्या. या स्पर्धेत 200 हून अधिक खेळाडूंनी भाग घेतला होता. प्रमुख पाहुणे गोमटेश विद्यापीठाचे संचालक राजेश पाटील, ऋषभ पाटील, शहराच्या पीईओ जहिदा पटेल, गोमटेश विद्यापीठाच्या विविध शाळांचे मुख्याध्यापक, सुनील पाटील, भैरू पाटील, रवी पुनजगौडा, महांतेश हिरेमठ, टिळकवाडी माध्यमिक विभागाच्या अध्यक्षा सिल्विया डिलिमा, योगशिक्षिका डॉ. ज्योती मोरे, प्रशासक प्रदीप पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी स्पर्धा सचिव अशोक मुन्नोळी, अजित बुडवी, बी. जी. सोलोमन, किरण तरळेकर, उमेश मजुकर, उमेश बेळगुंदकर, अर्जुन भेकणे, रामलिंग परीट, अनुराधा पुरी, प्रवीण पाटील आदींसह सहशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बुद्धिबळ स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे
मुले गट सोहम कदम (ठळकवाडी स्कूल), समर्थ कुलकर्णी (केएलएस स्कूल), मयूर चांडक (एम. व्ही. हेरवाडकर स्कूल), आर्या बुरसे (केएलएस स्कूल), स्वयंम वेर्णेकर (गोमटेश स्कूल), योगा स्पर्धा- मुले सुमित वागुळकर (एम. आर. भंडारी स्कूल), ओमकार नेतलकर (मुक्तांगण स्कूल), समर्थ वागुळकर (एम. आर. भंडारी स्कूल), साई चुगुळी (गोमटेश मराठी स्कूल), साईराज मेणसे (गोमटेश मराठी स्कूल), आर्टिस्टिक- पार्थ थोरात (संत मीरा), रिदमिक योगा-पवन मठद (संत मीरा)- विजेते









