पहिली बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशाल रॅलीचे आगमन आज महाराष्ट्राची उपराजधानी नागपुर इथं झाली आहे. शहरातल्या प्रसिद्ध झिरो माईल परिसरात या रॅलीचे स्वागत करण्यात आले.
ही रॅली नागपूर शहराच्या प्रमुख चौकातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेण्यात आली. यानंतर मशालची ज्योत पुणे आणि त्यानंतर राज्याची राजधानी मुंबईकडे निघाली आहे.
४४ व्या फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाडचं यजमानपद भारताकडे आहे. २८ जुलै ते १० ऑगस्ट २०२२ या कालावधीत चेन्नई इथं ४४ वी फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाड होणार आहे.