देशामधील 39 मुलां-मुलीचा सामवेश
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने बुधवारी टॉप नॅशनल प्लेयर्स स्टायपेंड स्कीम सुरू करण्याची घोषणा केली, जी प्रतिभा विकासात मदत करण्यासाठी एक आर्थिक साहाय्य उपक्रम आहे. अध्यक्ष नितीन नारंग यांच्या नेतृत्वाखालील हा प्रकल्प तळागाळातील बुद्धिबळपटूंना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणार आहेत. पहिले तिमाही स्टायपेंड पाठवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये 60,000 ते 1.5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम आहे. युवा बुद्धिबळपटूंच्या खात्यात ही रक्कम थेट जमा केली जाणार आहे. एप्रिल ते जून महिन्यांसाठी एकूण 42.30 लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. 7 वर्षांखालील ते 19 वर्षांखालील वयोगटातील खेळाडू या योजनेचे लाभार्थी असतील.
ही केवळ एक योजना नाही तर भारतातील प्रत्येक तरुण बुद्धिबळपटूला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय घेतला आहे, असे नारंग म्हणाले. आमच्या इतिहासात पहिल्यांदाच आम्ही देशामधील 39 मुली-मुलांच्या भविष्यात थेट गुंतवणूक करत आहोत, त्यांना त्यांच्या प्रतिभेचे विजयात रूपांतर करण्यासाठी आवश्यक असलेला शाश्वत आर्थिक आधार प्रदान करत आहोत. हे केवळ एक प्रतीक असून आमच्या खेळाडूंना पाठिंबा देत आहोत, असेही ते म्हणाले. राष्ट्रीय स्पर्धांचे महत्त्व वाढवणे हे एक प्रमुख उद्दिष्ट आहे, कारण ते एक मजबूत बुद्धिबळ परिसंस्था तयार करण्याचा पाया आहेत. राष्ट्रीय स्पर्धांमध्येच आपण खेळाडूची प्रतिभा ओळखू शकतो आणि त्यांचे संगोपन करू शकतो, असे नारंग म्हणाले.









