आण्विक आपत्तीमुळे झाले चकित करणारे म्युटेशन
वैज्ञानिकांनी चेर्नोबिल एक्सक्लूजन झोनमध्ये राहत असलेल्या 116 भटक्या श्वानांच्या रक्ताचे नमुने एकत्र केले आहेत. याच्या तपासणीत दोन वेगवेगळ्या गुणांनी युक्त श्वानांची संख्या आढळून आली असून जी आसपासच्या क्षेत्रातील अन्य श्वानांपेक्षा आनुवांशिक स्वरुपात वेगळी होती. या विषारी वातावरणात दीर्घकाळापयर्तं राहण्यासाठी हे श्वान अनुकूलित झाल्याचे समोर आले आहे. अशाप्रकारे तेथे अनोखे सुपरडॉग विकसित झाले आहेत.
श्वानांनी स्वत:ची आनुवांशिक महाशक्ती कशी विकसित केली हे आता समजून घेतले जात आहे. हे संशोधन माणसांमध्ये देखील अनेक पर्यावरणीय धोके असलेल्या अत्याधिक विषारी आणि खराब वातावरणात राहण्याच्या आरोग्य प्रभावांना चांगल्याप्रकारे समजून घेण्यास मदत करू शकते. या श्वानांमध्ये अँटी रेडिएशन अणि सामान्य पातळीपेक्षा अधिक इम्युनिटी यासारख्या सुपरपॉवर विकसित झाल्याचे वैज्ञानिकांचे सांगणे आहे.
सुपरपॉवर विकसित होण्याचे कारण
1986 मध्ये युक्रेनच्या उत्तर भागात चेर्नोबिल अणुप्रकल्पाच्या दुर्घटनेने इतिहासातील सर्वात मोठी किरणोत्सर्गी गळती केली होती. या आपत्तीनंतर माणसांना या क्षेत्रातून हटविण्यात आले होते. माणसांच्या अनुपस्थितीत येथे वन्यजीवन आणि भटक्या श्वानांनी स्वत:चे स्थान निर्माण पेले.
चेर्नोबिल एक्सक्लूजन झोनमध्ये राहणारे श्वान या विषारी वातावरणातही जिवंत आहेत. या क्षेत्रात किरणोत्सर्गाची पातळी मानवी जीवनासाठी 6 पट अधिक आहे. तरीही सुमारे 900 श्वान या विषारी वातावरणात रात आहेत. हे 900 भटके श्वान हे चेर्नोबिल सोडून गेलेल्या लोकांच्या पाळीव प्राण्यांचे वंशज असू शकतात.
संशोधनाची प्रक्रिया
कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या पर्यावरण आरोग्य वैज्ञानिक नॉर्मन जे. क्लेमन अणि त्यांच्या टीमने 2018-19 दरम्यान या श्वानांच्या रक्ताचे नमुने मिळविले होते. या नमुन्यांचे अमेरिकेत डीएनए विश्लेषण करण्यात आले. या श्वानांमध्ये 400 असे जेनेटिक लोकेशन आहेत, जे सामान्यापेक्षा वेगळे आहेत. हे जीन त्यांना विषारी वातावरणात जगण्याची क्षमता प्रदान करतात असे आढळून आले आहे.
श्वानांमध्ये मिळाले नवे जीन
वैज्ञानिकांनी 52 अशा जीनची ओळख पटविली आहे जे या विषारी क्षैत्रात राहिल्यामुळे विकसित झाले आहेत. प्रतिकूल वातावरणाने श्वानांच्या जेनेटिक्सला बदलले आहे. या श्वानांची ही क्षमता पिढीनुसार पुढे जात आहे. यामुळे ते रेडिएशन, अवजड धातू आणि प्रदूषणाबद्दल प्रतिरोधक ठरले आहेत. अशाप्रकारे या श्वानांमध्sय सामान्य श्वानांच्या तुलनेत एकप्रकारची सुपरपॉवर विकसित झाली आहे.
अन्य प्राण्यांमध्येही म्युटेशन
या क्षेत्रात राहणारे लांडगे, बेडुक देखील रेडिएशन आणि अन्य विषारी प्रभावांबद्दल प्रतिरोधक ठरले आहेत. स्थळानजीक आढळून येणाऱ्या बेडकांचे अध्ययन केले असता त्यांचा मूळ रंग बदलला असल्याचे स्पष्ट झाले. तसेच त्यांच्यात किरणोत्सर्ग झेलण्याची आणि दीर्घकाळ जिवंत राहण्याची क्षमता विकसित झाली आहे.
भविष्यासाठी अपेक्षा
या श्वानांच्या अनुकूलनाची स्थिती जाणून घेतल्याने मनुष्यांवर विषारी वातावरणाच्या प्रभावाला चांगल्याप्रकारे समजून घेता येऊ शकते असे संशोधकांचे मानणे आहे. हे अध्ययन मानवी आरोग्यावर पर्यावरणीय धोक्यांचा प्रभव कमी करण्यासाठी नवा तोडगा प्रदान करू शकते.









