वृत्तसंस्था / चेन्नई
2024 च्या इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत बुधवारी येथे चेन्नीयन एफसी आणि हैद्राबाद एफसी यांच्यात सामना खेळविला जाणार आहे. या सामन्यात दोन्ही संघांना विजयासाठी निशांत गरज आहे.
सध्या हे दोन्ही संघ गुणतक्त्यात खालच्या स्थानावर वावरत आहेत. त्यामुळे बुधवारच्या सामन्यात ते विजयासाठी झुंज देतील. चेन्नीयन संघ सध्या गुणतक्त्यात नवव्या स्थानावर आहे. बुधवारच्या सामन्यात त्यांनी विजय मिळविला तर चेन्नीयन संघ सातव्या स्थानावर राहिल. हैद्राबाद संघाने 10 सामन्यातून 7 गुण मिळविले आहेत. हा सामना बुधवारी सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल.









