वृत्तसंस्था / चेन्नई
महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धांच्या वेळापत्रकामध्ये (डब्ल्युटीए) तब्बल तीन वर्षांनंतर चेन्नई खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेंचे पुनरागमन होत असल्याची माहिती तामिळनाडू टेनिस संघटनेतर्फे देण्यात आली. सदर स्पर्धा डब्ल्युटीए टूरवरील 250 दर्जाची राहील. 27 ऑक्टोबरपासून सदर स्पर्धा सुरू होईल.
डब्ल्युटीएच्या 2022 च्या वेळापत्रकामध्ये चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेचा समावेश होता आणि झेक प्रजासत्ताकच्या लिंडा फ्रुव्हर्टोव्हाने एकेरीचे जेतेपद मिळविले होते. यावेळी चेन्नई खुली महिलांची टेनिस स्पर्धा मोठ्या प्रमाणात यशस्वी केली जाईल, असे तामिळनाडू टेनिस संघटनेचे अध्यक्ष विजय अमृतराज यांनी म्हटले आहे.









