फिरकीपटू नूर अहमद, कुलदीप यादव बजावणार मोलाची भूमिका
वृत्तसंस्था/ चेन्नई
चेन्नई सुपरकिंग्सचा सामना आज शनिवारी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग सामन्यात प्रभावी दिल्ली कॅपिटल्सशी होणार असून यावेळी नूर अहमद आणि कुलदीप यादव या दोन फिरकीपटूंमध्येही झुंज रंगणार आहे. त्यांची कामगिरी कशी होते त्यावरही सामन्याचा निकाल बराच अवलंबून राहील.
चेन्नईच्या उष्ण वातावरणात दुपारी हा सामना होईल आणि खेळपट्टीचे स्वरुप पाहता निश्चितच दोन्ही संघांना समान संधी राहतील. 5.25 च्या इकोनॉमी रेटसह कुलदीप हा आज खेळण्याची अपेक्षा असलेल्या चार फिरकीपटूंमध्ये गुणवत्तेच्या दृष्टीने विचार करता सर्वोत्तम आहे. अफगाणिस्तानचा फिरकीपटू नूरने आतापर्यंत 6.83 च्या तितक्याच प्रभावी इकोनॉमी रेटने नऊ बळी घेतले आहेत आणि तो मधल्या षटकांमध्ये निश्चितच काहीसा प्रभावी ठरू शकतो. कारण चेंडू वळण्याची अपेक्षा आहे. दोन्ही फिरकीपटूंच्या माऱ्याचे स्वरूप खूप वेगळे असल्याने ही एक आकर्षक लढत असेल.
नूर जलद गतीने गोलंदाजी करतो, तर धूर्त कुलदीपने क्रीजच्या कोनांचा वापर करण्याची आणि त्याच्या चेंडूंच्या गतीमध्ये बदल करण्याची कला साध्य केलेली आहे. नूरच्या चेंडूला फारशी उंची देत नाही, तर कुलदीप चेंडूला अधिक उंची देणे पसंत करतो. फलंदाजीच्या बाबतीत दिल्लीला निश्चितच थोडासा फायदा घेईल. कारण या वर्षी आशुतोष शर्मा, विप्रज निगम आणि अनुभवी के. एल. राहुल यांच्या उपस्थितीमुळे मधल्या फळीला थोडी जास्त मजबुती आलेली आहे. नवीन संघात राहुलवर कर्णधारपदाचा भार नसल्याने तो अधिक मोकळेपणाने खेळेल अशी अपेक्षा आहे.
सीएसकेसाठी महेंद्रसिंह धोनी आता पूर्वीसारखा फिनिशर राहिलेला नसून ही एक समस्या आहे. शिवम दुबे वगळता सीएसकेकडे असे खेळाडू नाहीत जे 180 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करत असताना 180 ते 200 च्या दरम्यानच्या स्ट्राइक रेटने गोलंदाजांवर आक्रमण करू शकतील. सलामीवीर राहुल त्रिपाठी हा आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये उच्च दर्जाच्या वेगवान गोलंदाजांविऊद्ध अजिबात आरामदायी दिसलेला नाही. धोनीचा त्याला सलामीवीर म्हणून खेळविण्याचा आणि कर्णधार ऋतुराज गायकवाडला एका स्थानाने खाली नेण्याचा घेतलेला निर्णय त्रिपाठीला सार्थ ठरविता आलेला नाही. संघ व्यवस्थापनाने मुंबईचा 17 वर्षीय सलामीवीर आयुष म्हात्रेला बोलावल्याने चेन्नई सुपर किंग्सचा आता त्रिपाठीवर तितका विश्वास राहिलेला नाही हे स्पष्ट होते. आयुष म्हात्रे भारताच्या 19 वर्षांखालील संघाकडून खेळला आहे आणि रणजी ट्रॉफीच्या गेल्या आवृत्तीत त्याने प्रथम श्रेणी शतके झळकावली आहेत.
दिल्लीच्या बाबतीत चेपॉकवर खेळताना त्यांच्या फलंदाजांसमोरील आव्हान विशाखापट्टणम येथील फलंदाजीस अनुरुप खेळपट्ट्यांपेक्षा खूपच जास्त खडतर असेल. विझागमधील दोन्ही सामन्यांमध्ये त्यांनी लक्ष्यांचा यशस्वीपणे पाठलाग केला. फाफ डु प्लेसिसची उपस्थिती त्यांच्यासाठी लाभदायी ठरू शकते. सीएसकेसाठी अनेक हंगाम खेळण्याचा त्याचा अनुभव आणि परिस्थितीचे ज्ञान जेक-फ्रेझर मॅकगर्क, ट्रिस्टन स्टब्स आणि अभिषेक पोरेलसारख्या तरुणांना मदतकारी ठरेल. वरील फलंदाज त्यांचे मुख्य घटक आहेत.
फ्रेझर-मॅकगर्कला फिरकी गोलंदाजांना हाताळताना समस्या येतात आणि रविचंद्रन अश्विन, जो सध्या त्याच्या सर्वोत्तम सुरात नाही (आतापर्यंत 10 षटकांत 99 धावा)तो पॉवरप्लेच्या षटकांमध्ये या तऊण ऑस्ट्रेलियन खेळाडूला अडचणीत आणू शकतो का हे पाहणे रंजक ठरेल. चेपॉक येथील दिल्ली व चेन्नई यांच्यातील सामन्यांचा इतिहास पाहता पारडे चेन्नईचे जड ठरते. कारण त्यांनी नऊपैकी सात सामने जिंकले आहेत. तथापि, केविन पीटरसनच्या मार्गदर्शनाखाली सध्याचा दिल्ली संघ प्रभावी दिसत आहे.
संघ : चेन्नई सुपर किंग्स : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एम. एस. धोनी, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मथीशा पाथीराना, नूर अहमद, रविचंद्रन अश्विन, डेव्हॉन कॉनवे, सय्यद खलील अहमद, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, विजय शंकर, सॅम करन, शेख रशिद, अंशुल कंबोज, मुकेश चौधरी, दीपक हुडा, गुर्जनप्रीत सिंग, नॅथन एलिस, जेमी ओव्हरटन, कमलेश नागरकोटी, रामकृष्णन घोष, श्रेयस गोपाल, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ.
दिल्ली कॅपिटल्स : अक्षर पटेल (कर्णधार), के. एल. राहुल, जॅक फ्रेझर-मॅकगर्क, कऊण नायर, फाफ डु प्लेसिस, डोनोव्हन फेरेरा, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, दर्शन नळकांडे, विपराज निगम, अजय मंडल, मानवंथ कुमार, त्रिपुराना विजय, माधव तिवारी, मिचेल स्टार्क, टी. नटराजन, मोहित शर्मा, मुकेश कुमार, दुष्मंथा चमीरा, कुलदीप यादव.
सामन्याची वेळ : दुपारी 3.30 वा.









