वृत्तसंस्था/ चेन्नई
2023 आयपीएल हंगामासाठी महेंद्रसिंग धोनीकडे पुन्हा चेन्नई सुपरकिंग्जचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. प्रारंभी, चेन्नईच्या सीईओनी आगामी आयपीएल हंगामासाठी कप्तानपदाच्या नावाबद्दल मौन पाळले होते.
गेल्या वषीच्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी अष्टपैलू रविंद्र जडेजाकडे चेन्नई सुपरकिंग्सचे नेतृत्व सोपविण्यात आले होते. पण जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्सची कामगिरी निकृष्ट झाल्याने या संघाच्या व्यवस्थापनाने पुन्हा काही सामन्यांमध्ये धोनीकडे नेतृत्व सोपविण्याचा निर्णय घेतला होता. 2022 आयपीएल हंगामात चेन्नई संघाने 14 सामन्यांमध्ये केवळ 4 सामने जिंकले होते. त्यामुळे स्पर्धेच्या गुणतक्त्यात त्यांना नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले. मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी चेन्नईपेक्षा फारशी वेगळी झाली नाही. मुंबई संघाला शेवटचे स्थान मिळाले. या स्पर्धेच्या इतिहासात गेल्या काही वर्षांमध्ये चेन्नई आणि मुंबई इंडियन्स यांनी आपल्या दर्जेदार कामगिरीच्या जोरावर मक्तेदारी राखली होती. पण गेल्या आयपीएल हंगामात स्पर्धा आयोजकांनी आणखी दोन नव्या संघांचा समावेश केला होता. गुजरात आणि लखनौ या दोन संघांची कामगिरी अप्रतिम झाली. हार्दिक पंडय़ाच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने पदार्पणातच आयपीएल चषकावर आपले नाव कोरले.
2023 आयपीएल हंगामासाठी चेन्नई संघाचे सीईओ के. विश्वनाथन अनुभवी धोनीकडे संघाचे नेतृत्व सोपविण्याची शक्मयता आहे, पण यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. धोनीने आपल्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्सला आतापर्यंत चारवेळा आयपीएल स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले आहे. 2021 आयपीएल हंगामात पहिल्या आठ सामन्यांमध्ये चेन्नई संघाला केवळ एकमेव सामना जिंकता आला होता. या सामन्यामध्ये संघाचे नेतृत्व जडेजाकडे सोपविण्यात आले होते. रविंद्र जडेजा फलंदाजी आणि गोलंदाजीत सूर मिळविण्यासाठी झगडत असल्याचे दिसून आले. त्यानंतर जडेजाने स्वतःहून कप्तानपद सोडण्याचा निर्णय घेतला आणि या संघाच्या फ्रँचायझीने पुन्हा धोनीकडे कप्तानपदाची जबाबदारी सोपविली होती.









