चेन्नाई :
तामिळनाडूतील चेन्नाई येथील अण्णा विद्यापीठात अभियांत्रिकी विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाच्या प्रकरणात आरोपी गन्नशेखर दोषी आढळला आहे. बुधवार, 28 मे रोजी येथील महिला न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर न्यायमूर्ती राजलक्ष्मी यांनी आरोपीला दोषी ठरविले. आता सोमवार, 2 जून रोजी या प्रकरणात न्यायालय निकाल देणार आहेत. लैंगिक छळाचा हा खटला 23 डिसेंबर 2024 चा आहे. विद्यापीठातील एका विद्यार्थिनीने 25 डिसेंबर रोजी या प्रकरणाची तक्रार केली होती. 23 डिसेंबरच्या रात्री 8 वाजता आपल्यावर कॉलेज कॅम्पसमध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर फूटपाथवर बिर्याणीचे दुकान चालवणाऱ्या गन्नशेखरला अटक करण्यात आली होती.









