दोन्ही संघांना विविध आघाडय़ांवर चिंता
पुणे / प्रतिनिधी
चेन्नई सुपरकिंग्सची कमकुवत गोलंदाजी आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरची झगडणारी फलंदाजी लाईनअप यामुळे आजची (बुधवार दि. 4) आयपीएल साखळी लढत समसमान ताकदीच्या संघात होणे अपेक्षित आहे. क्रिकेटमध्ये दोन मजबूत संघ आमनेसामने भिडतात, त्यावेळी त्यांच्यात जोरदार संघर्ष रंगणे साहजिक असते. पण, अडचणीतून मार्ग काढण्यासाठी झुंजणारे संघ आमनेसामने भिडतात, त्यावेळी देखील फारसे वेगळे चित्र नसते. आज त्याचीच प्रचिती येणे अपेक्षित आहे. ही लढत सायंकाळी 7.30 वाजता खेळवली जाणार आहे.
चेन्नईने मागील सामना जिंकला आहे तर बेंगळूर मागील सामना हरला आहे. ऋतुराजला सूर गवसल्याने चेन्नईचे टेन्शन हलके झाले आहे तर विराटने कमबॅक केल्याने बेंगळूरला दिलासा लाभला आहे.
पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सायंकाळी साडेसातपासून हा सामना सुरू होणार आहे. मंगळवारच्या सामन्यापूर्वी बेंगळूर दहापैकी पाच सामने जिंकत पाचव्या स्थानी तर चेन्नई नवव्या स्थानी होते.
रॉबिन उत्थप्पा, कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायडू, महेंद्रसिंग धोनी, रविंद्र जडेजा अशी चेन्नईकडे फलंदाजी आहे. ऋतुराजने मागच्या सामन्यात अर्धशतकी खेळी करुन फॉर्म गवसल्याचे दाखवून दिले आहे. याही सामन्यात त्याच्याकडून अशाच खेळीची अपेक्षा असणार आहे. त्याचा साथीदार कॉनवेनेही नाबाद अर्धशतकी खेळी करून चेन्नईचा डाव सावरण्यास हातभार लावला होता. या दोघांनी मागच्या सामन्यात शतकी सलामी दिली होती.
जडेजा कर्णधारपदावरून बाजूला झाला असून तो आता कोणत्याही दडपणाशिवाय खेळू शकेल. गोलंदाजीमध्ये अजूनही चेन्नईला सुधारणा करावी लागणार आहे. मुकेश चौधरी, प्रिटोरियस, महिश तिक्षणा, सॅन्टनर, जडेजा यांना टिच्चून मारा करावा लागणार आहे. क्षेत्ररक्षणातही चेन्नईला सुधारणा करावी लागणार आहे. मागच्या सामन्यात चेन्नईने चार ते पाच झेल सोडले होते.
दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरची कामगिरी संमिश्र झाली आहे. कोहलीने मागील सामन्यात अर्धशतकी खेळी केली. अशीच कामगिरी याही सामन्यात त्याच्याकडून अपेक्षित आहे. रजत पाटीदारनेही मागील लढतीत चांगली फलंदाजी करून बेंगळूरला सावरले होते. शाहबाज नदीमही उत्तम योगदान देत आहे. डय़ू प्लेसिस (9 सामन्यात 278) आणि मॅक्सवेलचे (7 सामन्यात 157 धावा) अपयश हे बेंगळूरच्या दृष्टीने चिंताजनक आहे. दिनेश कार्तिक (10 सामन्यात 218 धावा) हा फिनिशरची भूमिका चोखपणे बजावत असून गोलंदाजीमध्ये हॅझलवूड, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज यांच्यावर मदार असणार आहे. हसरंगाकडे फिरकीची कमान असेल.
संभाव्य संघ
आरसीबी ः फॅफ डय़ू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, वणिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक, जोश हॅझलवूड, शाहबाज अहमद, अनुज रावत, आकाश दीप, महिपाल लोमरोर, फिन ऍलन, शेरफेन रुदरफोर्ड, जेसॉन बेहरेनडॉर्फ, सुयश प्रभुदेसाई, चमा मिलिंद, अनिश्वर गौतम, कर्ण शर्मा, डेव्हिड विली, रजत पाटीदार, सिद्धार्थ कौल.
चेन्नई सुपरकिंग्स ः महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), रविंद्र जडेजा, मोईन अली, ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन ब्रेव्हो, अम्बाती रायुडू, रॉबिन उत्थप्पा, मिशेल सॅन्टनर, ख्रिस जॉर्डन, ऍडम मिल्ने, डेव्हॉन कॉनवे, शिवम दुबे, डेव्हॉन प्रिटोरियस, महिश तिक्षणा, राजवर्धन हंगरगेकर, तुषार देशपांडे, केएम असिफ, सी. हरी निशांत, एन. जगदीशन, सुब्रांशू सेनापती, के. भगत वर्मा, प्रशांत सोळंकी, सिमरनजीत सिंग, मुकेश चौधरी.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.
9 सामन्यात चेन्नईकडून एकाही गोलंदाजाची सरासरी 7.50 पेक्षा कमी नाही!
यंदाच्या आयपीएल हंगामात आतापर्यंत खेळलेल्या 9 सामन्यात चेन्नईचा एकही गोलंदाज प्रतिषटक 7.50 पेक्षा कमी इकॉनॉमीने गोलंदाजी करु शकलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. या संघातर्फे सर्वोत्तम इकॉनॉमी रेट महिश तिक्षणाचा (7.54) आहे. डेव्हॉन ब्रेव्हो (14 बळी) व मुकेश चौधरी (11 बळी) यांनी 10 पेक्षा अधिक बळी घेतले असले तरी त्यांचा इकॉनॉमी रेटही अनुक्रमे 8.73 व 9.82 असा खराब राहिला आहे.
आरसीबीतर्फे 10 सामन्यात केवळ 6 अर्धशतके! आरसीबीचा संघ 10 सामन्यात 5 विजयांसह पाचव्या स्थानी विराजमान असला तरी मागील सलग 3 पराभवांमुळे ते मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले गेले आहेत. 68 ही हंगामातील निचांकी धावसंख्या आरसीबीच्या खात्यावर असून आणखी एका सामन्यात अवघ्या 145 धावांचे आव्हान देखील या संघाला पेलवलेले नाही. आतापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यात या संघातर्फे केवळ 6 अर्धशतके झळकावली गेली असून डय़ू प्लेसिसची 2 अर्धशतके यात समाविष्ट









