ऑनलाईन टिम : चेन्नई
माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम आणि इतर पाच जणांची तामिळनाडूमधून राज्यसभेवर बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. यामध्ये पी. चिदंबरम यांच्यासह सत्ताधरी डीएमके( DMK) मधील 3 आणि AIADMK चे 2 असे पक्षीय बलाबल असणार आहे आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर बुधवारी सहाही उमेदवारांनी दाखल केलेले अर्ज छाननीसाठी घेण्यात आले. तामिळनाडू विधानसभेचे सचिव, के. श्रीनिवासन यांनी ही प्रक्रीया करून उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र छाननीसाठी घेतले होते. त्यानंतर सर्व नामांकन स्वीकारण्यात आले आहेत.
पि. चिदंबरम (Congress), ‘थंजई’ एस. कल्याणसुंदरम, आर. गिरीराजन, आणि केआरएन राजेशकुमार (सर्व DMK), सी.वे. षणमुघम आणि आर. धर्मर (सर्व AIADMK) यांनी तामिळनाडू राज्यातून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज सादर केले आहेत.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख शुक्रवार असून सहाही जणांचे उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले आहे. त्यामुळे शुक्रवारी ही निवडणूक बिनविरोध घोषित करण्यात येणार आहे. चिदंबरम यांच्या निवडीमुळे, 2016 मध्ये ईएम सुदर्शना नचियप्पन यांच्या निवृत्तींमुळे रिक्त झालेली जागा सहा वर्षांनंतर काँग्रेसकडे येत आहे. ते तामिळनाडूमधून कॉंग्रेसचे एकमेव राज्यसभा सदस्य असतील.