सातारा :
सातारा शहरातील वाढे फाटा येथील एका हॉटेलमध्ये रत्नागिरी जिह्यातील राजापूर तालुक्यातील विलये येथील झहिर अब्बास मनचेकर (वय 40) या व्यक्तीला माझ्याकडे स्मशानी शक्ती आहे. त्याचा वापर करुन पैशाचा पाऊस पाडतो अशी बतावणी करुन संतोष श्रावण लोखंडे याने तब्बल 13 लाख रुपयांना फसवले असून त्या प्रकरणी शाहुपूरी पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. दरम्यान, लोखंडे हा बुलंद पोलीस टाईम्सचा पत्रकार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्याकडून अनेकांना गंडा घातला गेला आहे.
त्याबाबत मिळालेली माहिती अशी, झहिर मंचेकर हा तरुण खाजगी नोकरी करतो. तो विलये येथे राहतो. त्याची आणि संतोष लोखंडे याची मित्राकरवी ओळख झाली. संतोष याने त्याला माझ्याकडे स्मशानी शक्ती आहे. त्या शक्तीच्या माध्यमातून पैशाचा पाऊस पाडतो. डबल पैसे करुन देतो अशी बतावणी करुन त्याकरता वाढे फाटा येथील एका लॉजमध्ये बैठक झाली. जुलै 2018 ते एप्रिल 2019 पर्यंत त्याला वाढे फाटा येथील एका लॉजवर आणि राजापूर येथे 13 लाख रुपये घेतले. ते संतोषने परत दिले नाहीत. तसेच त्याचा मित्र अभिषेक सोळस्कर, मुंबई येथील मित्र उदय सावंत, पुजारी नथू झिपरु शिंदे यांचीही अशीच फसवणूक केली.
त्यांचेही पैसे त्याने परत दिले नाहीत. त्यावरुन त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तो बुलंद पोलीस टाईम्स अशा कोणत्यातरी पेपरचा पत्रकार असल्याचे पोलिसांना सांगत असून त्यास शाहुपूरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरु असून याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिर्के हे करत आहेत.








