प्रथमच युएसबी सी पोर्टची सुविधा मिळणार : किंमत 7,900 रुपये राहणार असल्याची माहिती
नवी दिल्ली
जगातील दिग्गज टेक कंपनी अॅपल यांनी आपली सर्वात स्वस्त पेन्सिल भारतीय बाजारात सादर केली आहे. साधारणपणे या पेन्सिलची किंमत 7,900 रुपये इतकी राहणार असल्याची माहिती कंपनीने यावेळी दिली आहे. यामध्ये टाईप सी कनेक्टिविटीसोबत चार्जिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे. कंपनीने यावेळी दावा केला आहे की, अशी पेन्सिल पहिल्यांदाच सादर केली असून जेन 1 आणि जेन 2 याच्यासोबत स्पर्धा करणार असून टिल्ट सेंसिटिव्ह राहणार आहे. म्हणजे नॉर्मल पेन किंवा पेन्सिलप्रमाणे स्क्रीनवर काम करु शकणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. नोव्हेंबरपासून या पेन्सिलचे कार्यालयीन वेबसाईटवर जाऊन बुकिंग करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.









