न्हावेली : वार्ताहर
न्हावेली टेंबवाडी येथे रविवार १३ एप्रिल रोजी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे.त्यानिमित्त रात्री १० वाजता श्री देव इसवटी कला क्रिडा मंडळातर्फे यशवंत माणके लिखित दोन अंकी नाटक ‘ चौथरा ‘ नाटक सादर केले जाणार आहे.नाटकाचे दिग्दर्शक गंगाराम नेमण कलाकार सागर तेंडुलकर,शाम नाईक,सुंदर पार्सेकर,रुपेश नाईक,प्रदिप पार्सेकर,सुरेश गावडे,कृष्णा नाईक,अमरेश गावडे,सत्यवान गावडे,रोहन परब,समर्थ गावडे वैभवी सोकटे परुळेकर,शोभा मांजरेकर,हर्षदा बागायतकर यांच्या भूमिका आहेत.नाट्यरसिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन इसवटी मंडळ व ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.









