न्हावेली / वार्ताहर
श्रीकृष्ण देव ईसवटी कला क्रिडा मंडळ न्हावेली यांचा यशवंत माणके लिखित ‘चौथरा’ हा नाट्यप्रयोग श्री समर्थ साटम महाराज कला क्रीडा मंडळ निरवडे झरबाजार यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा 27 एप्रिल रोजी रात्रौ साडेनऊ वाजता निरवडे झर बाजार येथे आयोजित करण्यात आला आहे.न्हावेली इसवटी मंडळाने अलीकडेच हा प्रयोग सादर केला होता याला भरभरून असा प्रतिसाद मिळाल्यानंतर जनतेच्या मागणीनुसार निरवडे येथे या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.या नाट्यप्रयोगाचे दिग्दर्शन गंगाराम नेमण यांनी केले असून यामध्ये कलाकार म्हणून सागर तेंडुलकर,श्याम नाईक,सुंदर पार्सेकर,रुपेश नाईक, प्रदीप पार्सेकर,सुरेश गावडे,कृष्णा नाईक, अमरेश गावडे,सत्यवान गावडे, रोहन परब, समर्थ गावडे, सौ वैभवी सोकटे परुळेकर,सौ शोभा मांजरेकर,कु. हर्षदा बागायतकर यांनी काम केले आहे. तरी नाट्य रसिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन साटम महाराज कला क्रीडा सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
Previous Articleदेवसू शेंडोबा माऊली मंदिरात नवचंडी व दत्तयाग यज्ञ जपाला प्रारंभ
Next Article प्राथमिक शिक्षक संघटनेचे कार्य कौतुकास्पद









