नवी दिल्ली :
सॅमसंग स्मार्टफोन वापरकर्त्यांना लवकरच आपल्या फोनमध्ये चॅटजीपीटीचा वापर करण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये कोरियन टेक कंपनी याच्याकरीता आपल्या इंटरनेट ब्राऊजर अॅपमध्ये एआय भाषेचे मॉडेल लागू करणार आहे.
सॅमसंग कोणत्याही प्रकारे ब्राउजरच्या आतमध्ये चॅटजीपीटीचे एकत्रितपणे शोध घेण्यास मदत करणार आहे. या फिचरला प्रायोगिक पातळीवर सुरु करण्यात येणार असल्याची शक्यता सांगितली जात आहे.
एआयच्या फिचर्सचा शोध
प्राप्त अहवालानुसार सॅमसंग आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रयोग करत असून यामध्ये एआय सर्वोत्तम फिचर्स बाजारात आणण्याचा प्रयत्न आहे. सॅमसंगचा एआय फिचर्ससाठी गुगल सर्चला मायक्रोसॉफ्ट बिंगवर स्वीच करण्याचा विचार करतेय.









