प्रतिनिधी,कोल्हापूर
Charukirti Maharaj : श्रवणबेळगोळ (जि. हसन, कर्नाटक) येथील जैन मठाचे प. पू. स्वस्तिश्री कर्मयोगी चारुकीर्ती महाराज यांचे गुरूवारी समाधीपूर्वक निधन झाले. त्यांच्या निधनाने कोल्हापूर जिल्ह्यातील जैन समाजातून शोक व्यक्त करण्यात आला. जैन बंधू-भगिनींनी दु:ख व्यक्त केले.
स्वस्तिश्री कर्मयोगी चारुकीर्ती महाराज वयाच्या 21 व्या वर्षी दीक्षा घेतली. 74 व्या वर्षी त्यांचे समाधीपूर्वक निधन झाले. चारुकीर्ती महाराजांचे कोल्हापूरशी वेगळे नाते होते. गेली अनेक वर्षे ते कोल्हापूरमध्ये प्रवचन व इतर धार्मिक कार्यक्रमांसाठी येत असत. त्यांचे हजारो अनुयायी कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. कोल्हापुरातील वास्तव्यात ते लक्ष्मीसेन जैन मठ, शाहूपुरीतील जैन मंदिर, जैन बोर्डिंग येथे वास्तव्यास असत. लक्ष्मीसेन जैन मठाचे स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक महाराज यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी नवीन भट्टारक महाराज नेमण्यात चारुकीर्ती महाराजांची महत्वाची भूमिका होती.
सध्या जे अभिनव लक्ष्मीसेन भट्टारक महाराज आहेत. त्यांची नियुक्ती करण्याच्या प्रक्रियेत चारुकीर्ती महाराज यांचे मार्गदर्शन, प्रेरणा आणि पुढाकार होता. चारुकीर्ती महाराज यांना मानणारे कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो अनुयायी त्यांच्या दर्शनाला येत असत. तसेच श्रवणबेळगोळला जात असत. गुरुवारी त्यांच्या समाधीपूर्वक निधनाच्या वृत्तानंतर जिल्ह्यातील जैन बांधवांत शोक पसरला. लक्ष्मीसेन भट्टारक महाराजांचे सेवक रोहित रोटे यांनी चारुकीर्ती महाराजांच्या लक्ष्मीसेन जैन मठातील भेट, मार्गदर्शन आणि वास्तव्याच्या आठवणींना उजाळाला दिला.
दक्षिण भारत जैन सभेतर्फे आदरांजली
दरम्यान, चारुकीर्ती महाराजांच्या समाधीपूर्वक निधनावर दक्षिण भारत जैन सभेच्या वतीने शोक व्यक्त करण्यात आला. त्यांच्या विचारावर आमची पुढील वाटचाल राहिल, अशी प्रतिक्रिया सभेचे खजानिस संजय शेटे यांनी व्यक्त केली. तसेच त्यांच्या कोल्हापूर भेटीतील आठवणींना उजाळा दिला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









