चेन्नई :
वॉलमार्ट ग्लोबल टेक या कंपनीच्या भारतीय प्रमुखपदी बाळू चर्तुवेदूला यांची निवड करण्यात आली आहे. ग्लोबल वॉलमार्ट टेक ही वॉलमार्ट या रिटेल क्षेत्रातील मोठ्या कंपनीची सहकारी कंपनी आहे. चर्तुवेदूला हे याआधी कंपनीच्या अमेरिकेतील ओमनी टेक ऑर्गनायझेशन करता उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. याआधी कंपनीचे भारतीय प्रमुख पद हरी वासुदेव यांच्याकडे होते.









