आकाराने लहान पण खाताना खूप चविष्ट असणाऱ्या चारोळीचा वापर मिठाई किंवा खीर बनवताना केला जातो. पण याव्यतिरिक्त चारोळीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यामध्ये व्हिटॅमिन बी 1, बी 2 आणि व्हिटॅमिन C देखील भरपूर आहे. चारोळ्यामध्ये लोह, कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखी अनेक खनिजे असल्यामुळे चारोळी आरोग्याच्या अनेक समस्यांवर लाभदायक ठरू शकते.आज आपण चारोळीचे आणखी कोणते फायदे आहेत हे जाणून घेऊ.
मायग्रेन किंवा डोकेदुखीचा त्रास असल्यास चारोळी बारीक करून कपाळावर लावा किंवा दुधात मिसळून प्या. यामुळे डोकेदुखीपासून सुटका मिळेल.
चेहऱ्यवरील मुरमांवर चारोळीची पेस्ट आणि त्यात ऑलिव्ह ऑइल मिसळून चेहऱ्यावर लावल्यास काही दिवसात पिंपल्सच्या समस्येपासून सुटका मिळेल.
रोज चारोळी खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत राहते. हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते.
जर तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत आणि संसर्ग किंवा विषाणूमुळे असुरक्षित असेल, तर तुमच्या आहारात चारोळीचा समावेश करा.यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते.
चारोळीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे अल्सरसारख्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करतात. मधुमेहाच्या रुग्णांनी चारोळी चूर्ण रोज दुधात उकळून पिऊन प्यावे. चारोळीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात, ज्यामुळे ते रक्तातील साखरेचे प्रमाण राखण्याचे काम करते.
केसांच्या पोषणासाठी अतिशय फायदेशीर मानल्या जाणार्या चारोळीमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आढळतात. केसांना चारोळीचे तेल किंवा मास्क लावल्याने केसांना कंडिशनरची गरज भासत नाही.
Previous ArticlePOCSO पोक्सोच्या गुह्यातल्या शिक्षकाची बदली सातारा जिह्यात नाहीच
Next Article ‘कसब्या’साठी काँग्रेसचे 16 जण इच्छूक









