भात पोसवणीच्या अवस्थेत, बाजारात विशेष मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
मागील वर्षापासून तालुक्मयात काळय़ा भाताची लागवड केली जात आहे. आरोग्याला उत्तम असलेल्या या तांदळाला विशेष मागणी असल्याने या भाताची लागवड करण्याकडे शेतकऱयांचा कल वाढला आहे. गतवषी काही शेतकऱयांनी प्रायोगिक तत्वावर या भाताची पेरणी केली होती. दरम्यान समाधानकारक उत्पादन झाल्याने यंदा काळय़ा भाताचे क्षेत्र वाढले आहे. विशेषतः यापासून काळाच तांदूळ उत्पादित होत असल्याने काही नागरिक कुतूहल म्हणून हा तांदूळ खरेदी करत आहेत.
अडीचशे रुपये प्रतिकिलो दर
तालुक्मयातील हिंडलगा, जाफरवाडी, सांबरा, कणबर्गी यासह इतर भागात काळय़ा भाताची लागवड झाली आहे. साधारण 110 दिवसांत काळय़ा जातीचे भात पोसवणीला येते. त्यामुळे सध्या काळे भात पोसवणीच्या अवस्थेत आहे. तालुक्मयात दोडगा, बासमती, इंद्रायणी, सोनम, शुभांगी, मनिला आदी भाताची पेरणी आणि लागवड झाली आहे.
त्याबरोबर काही मोजक्मया शेतकऱयांनी काळय़ा भाताची पेरणी केली आहे. पेरणी दरम्यान काळय़ा भाताचे बियाणे 600 रुपये किलो दराने शेतकऱयांनी आणले आहेत. काळय़ा तांदळाची बियाणे देखील महाग आहेत. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱयांना ते न परवडणारे आहे. शेतकऱयांनी इतर राज्यातून हे बियाणे आणून पेरणी केली आहे. विशेषतः बाजारात या ब्लॅक राईसला अधिक मागणी आहे. शिवाय अडीचशे रुपये प्रतिकिलोच्या पुढे दर असल्याचीही प्राथमिक माहिती आहे.
गतवषी प्रथमतःच लागवड करण्यात आली होती. त्यामुळे हा ब्लॅक राईस कसा असणार किंवा किती उत्पादन होणार? याबाबत शेतकऱयांमध्ये संभ्रम होता.
मात्र गतवषी या भाताचे समाधानकारक उत्पादन झाले होते. त्यामुळे यंदा लागवड वाढली आहे. त्यामुळे उत्पादनही बऱयापैकी होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.
तांदूळ आरोग्यदायी असल्याने विशेष मागणी
तालुक्मयात गतवषीपासून काळय़ा भाताची पेरणी केली जात आहे. शिवारात एक वेगळेपण म्हणून काही शेतकरी या भाताची लागवड करीत आहेत. हा तांदूळ आरोग्यदायी असल्याने बाजारात देखील या तांदळाला विशेष मागणी आहे.
– आर. बी. नायकर (तालुका साहाय्यक अधिकारी)









