वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंड महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार चार्लोट एडवर्ड्स यांची इंग्लंड महिला संघाची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे ईसीबीने सांगितले. 20 वर्षांच्या कारकिर्दीत 45 वर्षीय एडवर्ड्स यांनी 300 हून अधिक सामन्यांत इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले. व्हाईटबॉल क्रिकेटच्या दोन्ही विश्वचषक स्पर्धा आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच अॅशेस मालिका जिंकल्या आहेत. दहा वर्षे त्यांनी राष्ट्रीय संघाचे कर्णधारपद भूषविले होते. टी-20 वर्ल्ड कप व अॅशेस मालिकेत इंग्लंड संघाचे खराब प्रदर्शन झाल्यानंतर 21 मार्च रोजी प्रशिक्षक जॉन लेविस यांनी पद सोडले होते. 2022 पासून ते या पदावर होते. 9 वर्षापूर्वी झाल्यानंतर त्यांनी मायदेशातील व विदेशातील अनेक संघांना त्यांनी प्रशिक्षण दिले आहे.









