प्रतिनिधी/ बेळगाव
बेनकनहळ्ळी-गणेशपूर गावामधील आराध्य दैवत श्री महालक्ष्मी देवीची यात्रा 33 वर्षांनंतर 23 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. यात्रेसाठी लागणारी रथसामग्री दि. 5 मार्च रोजी संतिबस्तवाड गावातून ढोलताशांच्या गजरात आणण्यात आली. यावेळी बेनकनहळ्ळी-गणेशपूर ग्रामस्थ, पंचकमिटीचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.









