ग्राहकांना तक्रार करण्याचे गोवा कॅन संस्थेचे आवाहन
प्रतिनिधी/ पणजी
राज्यात हॉटेल व्यवसाय तेजीत चालत आहे. अशाही परिस्थितीत राज्यातील काही हॉटेल व्यावसायिक ग्राहकांची लुबाडणूक करताना दिसत आहेत. ग्राहकांना सर्व्हीस चार्ज लावून अतिरिक्त पैसे उकळत आहेत. या गोष्टीची दखल घेत आणि ग्राहक संरक्षण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविऊद्ध दिल्ली उच्च न्यायालयाने काढलेल्या आदेशाचा दाखला देत गोवा कॅन या संस्थेने ग्राहकांनी रितसर तक्रार दाखल करावी, असे आवाहन केले आहे.
गोवा कॅन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये जेवल्यानंतर जेवणाच्या बिलांवर अतिरिक्त सर्व्हीस चार्ज आकारला जात आहे. हॉटेल मालकांनी सर्व्हीस चार्ज लावण्याची सक्ती नसतानाही ते आकारत आहेत. ग्राहक संरक्षण कायद्याचे उल्लंघन करून काही हॉटेल व्यावसायिक सर्व्हीस चार्ज लावत असल्याचे निरीक्षण दिल्ली उच्च न्यायालयाने आदेशात नोंदवल आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे हॉटेलांमध्ये सर्व्हीस चार्ज सक्तीचा नाही, असे नमूद केले आहे. हॉटेलांमध्ये सर्व्हीस चार्ज देऊ नये, अशी जागृतीही केंद्रीय ग्राहक व्यवहार खात्याने केलेली आहे. सर्व्हीस चार्ज किंवा टीप हे ग्राहकांनी आपल्या खुशीने दिलेली रक्कम असते. ती देण्याबाबत कुणी सक्ती करू शकत नाही. जर कुणी सक्ती करीत असल्यास याविऊद्ध ग्राहक संरक्षण कायद्याचे उल्लंघन ठरते. ग्राहक हक्क आणि निष्पक्षता निश्चित करण्यासाठी उच्च न्यायालयाने ग्राहक रक्षण प्राधिकरणाची मार्गदर्शक तत्त्वेही लागू केलेली आहेत. त्यामुळे रेस्टॉरंट किंवा हॉटेलमालक ग्राहकांकडे सर्व्हीस चार्ज भरण्यासाठी आग्रह धरू शकत नाही. बिलामध्ये वेगळे कारण दाखवून सर्व्हीस चार्ज घेण्याचा प्रकार घडल्यास हा ग्राहक संरक्षण कायदा 2019 खाली गैरव्यवहार ठरतो. म्हणून गोव्यात जर कुणी रेस्टॉरंट सर्व्हीस चार्ज घेत असेल तर ग्राहक संरक्षण कायद्याचे उल्लंघन म्हणून याविऊद्धची तक्रार gदम्aहम्दस्ज्त्aग्हेमत्त्@gस्aग्त्.म्दस् यावर करावी, असे आवाहन गोवा कॅन या संस्थेने केले आहे.








