चापोली धरणावरील अश्लील व्हिडीओ प्रकरण
प्रतिनिधी /मडगाव
आपल्या बोल्ड अदासाठी नेहमीच चर्चेत राहिलेली अभिनेत्री पूनम पांडे हिचा कणकोणच्या चापोली धरणावर गेल्या दीड वर्षापूर्वी नग्न अवस्थेत अश्लील व्हिडीओ शूट केला होता व तो व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. या प्रकरणात काणकोण पोलिसांनी पूनम पांडेच्या विरोधात काणकोण प्रथम वर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे पूनम पांडेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अभिनेत्री पूनम पांडे व तिचा पती सॅम बॉम्बे हे दोघे गोव्यात आले होते व ते काणकोण येथे उतरले होते. यावेळी त्यांनी चापोली धरणावर जाऊन 2 नोव्हेंबर 2020 रोजी एक नग्न अवस्थेत अश्लील व्हिडीओ शूट केला होता. हा अश्लील व्हिडीओ तिचे पती सॅम बॉम्बे यांनीच शूट केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गोव्यात एकच खळबळ माजली होती. या प्रकरणी काणकोण पोलीस स्थानकावर तक्रार नोंद झाल्यानंतर पोलिसांनी अभिनेत्री पूनम पांडे व तिचा पती सॅम बॉम्बे याना अटक केली होती.
चापोली धरणावर व्हिडीओ शूट करण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी घेण्यात आली नव्हती तसेच धरणावर कुणीच नसल्याची संधी साधून हा अश्लील व्हिडीओ शूट करण्यात आल्याचा त्याच्यावर आरोप होता. या प्रकरणात धरणावर काम करणाऱया काही कर्मचाऱयांवर सुद्धा कारवाई करण्यात आली होती.
या प्रकरणी पूनमचा वादग्रस्त पती सॅम बॉम्बे हाही संशयित असून अश्लील चित्रीकरण प्रसारित केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.









