प्रशासनाचा नियम, दफनभूमीसाठी व्हीआयपी पास
जेव्हा एखादा स्वकीय इहलोकातून निघून जातो, तेव्हा केवळ त्याच्या आठवणी आपल्यासोबत राहतात. ज्या धर्मांमध्ये पार्थिव दफन करण्याची प्रथा आहे, त्या धर्माचे लोक स्वकीयांच्या मृत्यूनंतर त्यांच्या थडग्याच्या ठिकाणी जात अश्रू ढाळत असतात. परंतु अशाच एखाद्या स्वकीयाच्या थडग्याच्या ठिकाणी जाण्यापासून रोखण्यात आल्यास किंवा पैसे मागण्यात आल्यास माणुसकी आहे का असा प्रश्न विचारला जाईल. अलिकडेच ब्रिटनमध्ये असे घडले आहे.
ब्रिटनमधील स्टोक-ऑन-ट्रेंट शहरात गार्डेन ऑफ रिमेंब्रेस नावाची दफनभूमी आहे. या दफनभूमीच्या प्रशासनाने अजब नियम लागू केला आहे. प्रशासनाने लोकांसाठी व्हीआयपी पास तयार करविले असून ते प्राप्त केल्यावरच लोक स्वकीयाच्या थडग्याला भेट देऊ शकतात. तेथे अश्रू ढाळू शकतात. तर पास नसलेला व्यक्ती केवळ कार्यालयीन कामकाजाच्या वेळेतच दफनभूमीला भेट देऊ शकतो.
दफनभूमीच्या बाहेर एक नोटीस लावण्यात आली असून त्यावर जानेवारी 2025 पासून या ठिकाणाला इलेक्ट्रिक गेटने व्यापले जाईल, हे निश्चित वेळतेच खुले होईल असे नमूद आहे. दफनभूमीत प्रवेश एका व्हीआयपी पासच्या मदतीने होईल. प्रशासन या नियमाद्वारे दफनभूमीत काम करणारे कर्मचारी, मृतांचे कुटुंबयी आणि अन्य लोकांना सुरक्षित करू पाहत आहे.
तर पास न मिळविलेल्या लोकांना सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते रुपारी 3 वाजेपर्यंतच दफनभूमीत प्रवेश करता येणार आहे. वीकेंड, बँक हॉलिडे, किंवा ऑफिस बंद असलेल्या दिवशी पास नसताना दफनभूमीत प्रवेश करता येणार नाही. हा व्हीआयपी पास 532 रुपये आणि 1064 रुपयांचा असणार आहे.









