प्रतिनिधी/ रत्नागिरी
मुंबई येथील सराफ व्यापारी किर्तीकुमार अजयराज कोठारी यांच्या खूनप्रकरणी शहर पोलिसांकडून न्यायालयापुढे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आह़े पैशाच्या हव्यासातून तिघांनी कोठारी यांचा खून केल्याचा आरोप पोलिसांकडून ठेवण्यात आला आह़े भरबाजारपेठेत झालेल्या या खुनाच्या घटनेच्यावेळचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून देण्यात आले असून हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आह़े
भूषण सुभाष खेडेकर (42, ऱा खालची आळी, रत्नागिरी), रिक्षाचालक महेश मंगलप्रसाद चौगुले (39, ऱा मांडवी सदानंदवाडी, रत्नागिरी) व फरीद महामूद होडेकर (36, ऱा भाटय़े खोतवाडी) अशी दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत़ दोषारोपपत्रात पोलिसांकडून या घटनेतील महत्त्वाचे साक्षीदार असल्याचाही दावा केला आह़े तसेच सीसीटीव्ही फुटेजसंदर्भात भारतीय साक्षी पुरावा अधिनियम 1872 चे 65 ब चे प्रमाणपत्रही जोडण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आह़े
गुह्यातील माहितीनुसार, किर्तीकुमार कोठारी हे आपल्या सोने-चांदीच्या व्यवसायासाठी 19 सप्टेंबर 2022 रोजी रत्नागिरी आले होत़े याचदिवशी त्यांचा फोन अचानक बंद लागत असल्याचे त्यांचा मुलगा करण याच्या लक्षात आल़े मुंबईत असलेल्या करण याने तातडीने रत्नागिरीत धाव घेत शहर पोलिसात कोठारी यांचा थांगपत्ता लागत नसल्याची तक्रार दाखल केल़ी पोलीस तपासात शहरातील गोखले नाका येथील त्रिमूर्ती ज्वेलर्सचे मालक भूषण खेडेकर याने आपल्या 2 साथीदारांच्या मदतीने कोठारी यांचा खून केल्याचे समोर आल़े यानंतर कोठारी यांचा मृतदेह हा रिक्षामध्ये टाकून गुहागर तालुक्यातील आबलोली येथील वहाळामध्ये टाकल्याचे तपासात उघड झाल़े
खून करण्यामागच्या कारणांचा शोध घेत असता पोलिसांना असे आढळून आले की, त्रिमूर्ती ज्वेलर्सचा मालक भूषण खेडेकर हा कर्जबाजारी झाला होत़ा तसेच तो किर्तीकुमार कोठारी यांचे पैसेही देणे होत़ा किर्तीकुमार कोठारी हे ठाणे जिह्यातील भायंदर येथील एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी होत़े तसेच ते मोठे व्यापारी होते. ही गोष्ट भूषण याला माहिती होत़ी गेल्या 10 वर्षापासून कोठारी हे रत्नागिरीत सोने-चांदीच्या व्यवसायासाठी येत असत़ त्यामुळे यावेळी कोठारी हे मोठी रक्कम आपल्यासोबत घेऊन आले असल्याचा कयास भूषण याने बांधला होत़ा भूषण खेडेकर याने उधारीचे पैसे देण्याच्या बहाण्याने कोठारी यांना आपल्या दुकानात बोलावून घेतल़े यावेळी दुकानात महेश चौगुले व फरीद होडेकर हे पहिल्यापासूनच हजर होत़े कोठारी हे गोखले नाका येथील त्रिमूर्ती ज्वेलर्स दुकानात दाखल होताच भूषण याने दुकानाचे शटर खाली केल़े तसेच संधी साधून भूषण याने कोठारी यांचा दोरीच्या सहाय्याने गळा आवळून खून केल़ा तसेच मृतदेह रिक्षातून गुहागर तालुक्यातील आबलोली येथील पऱयामध्ये टाकून दिल्याचे तपासात उघड झाल़े
सोने–चांदी पोलिसांनी केली हस्तगत
कोठारी यांच्या खुनानंतर त्यांच्याजवळ असलेल्या सोने, चांदी व रोख रक्कम नेमकी कोठे गेली, या बाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत होत़ा अखेर पोलासांनी या प्रकरणी कसून तपास करत चोने-चांदी व रोख रक्कम हस्तगत केल़ी यामध्ये 5 तोळे सोने (51 ग्रॅम), 1 लाख 45 हजार रुपयांची रोकड व 1 हजार 300 ग्रॅम चांदी असा समावेश आहे.









