पुणे / वार्ताहर :
पुण्याच्या कात्रज परिसरात चरस विक्रीच्या तयारीत असलेल्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एक किलो 21 गॅम चरस जप्त करण्यात आले आहे. त्याची बाजारातील किंमत 10 लाख 21 हजार रुपये आहे.
सर्फराज मुजफ्फर खान (वय 35, रा. मांगडेवाडी, कात्रज, पुणे, मु. रा. कदमवाडी, कोल्हापूर) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे अमली पदार्थ विरोधी पथक रविवारी (दि.23) परिमंडळ पाचमधील पोलीस ठाण्याच्या परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी एक व्यक्ती मांगडेवाडी-कात्रज येथे चरस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला. जाधवनगर, मांगडवाडी रस्त्यावर एक व्यक्ती संशयितरित्या थ?ांबलेला दिसला. त्याच्या पाठीवर एक बॅग होती. पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने त्यांनी सर्फराज खान याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्या बॅगेत दहा लाख 21 हजार रुपये किंमतीचा एक किलो 21 ग्रॅम चरस, दहा हजार रुपये किंमतीचा एक मोबाईल असा दहा लाख 31 हजार रुपयांचा मुद्देमाल आढळला. पोलिसांनी हा मुद्देमाल ताब्यात घेत खान याला अटक केली. अधिक तपास अमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पोलीस उपनरीक्षक एस. नरके करत आहेत.
अधिक वाचा : खूशखबर! दिवाळीच्या मुहूर्तावर सिडकोकडून 7849 घरांची लॉटरी जाहीर









