बेंगळूरचा रामा सोमशेखर पहिला उपविजेता तर बेळगावच्या प्रताप कालकुंद्रीकर दुसरा उपविजेता
बेळगाव : नंजनगुड येथे कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव स्पर्धा व नंजनगुड शरीरसौष्ठव संघटना यांच्यावतीने राज्यस्तरीय वज्रदेही शरीरसौष्ठव स्पर्धेत उडुपीच्या चरनराजने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर वज्रदेही हा मानाचा किताब पटकाविला. बेंगळूरच्या रामा सोमशेखर याने पहिले उपविजेतेपद तर बेळगावच्या प्रताप कालकुंद्रीने दुसरे उपविजेतेपद पटकाविले. बेळगावच्या मंजुनाथ कोल्हापुरेला उत्कृष्ट पोझरचा किताब देण्यात आला. नंजनगुड येथे घेण्यात आलेल्या आबीबीएफ मुंबईच्या मान्यतेनुसार खालील वजनी गटात स्पर्धा घेण्यात आली.
- 55 किलो गट : 1) सुरज भंडारी-बेळगाव, 2) श्री शिव मोदगेकर-बेळगाव, 3) राजू मुचंडी-बेळगाव, 4) सलमान खान-शिमोगा, 5) स्टिपन दास-धारवाड,
- 60 किलो गट : 1) शशिधर नाईक-उडपी, 2) नितेश म्हैसूर, 3) गौतम बी. आर.-चिक्कमंगळूर, 4) नंजनगुडस्वामी-म्हैसूर, 5) चेतन-म्हैसूर.
- 65 किलो गट : 1) सुरज आचार्य-कारवार, 2) सोमशेखर खारवी-उडपी, 3) मंजुनाथ-बेंगळूर, 4) यशवंत-मंड्या, 5) चेतन तळवार-कारवार.
- 70 किलो गट : 1) सुनील भातकांडे-बेळगाव, 2) विजय पाटील-बेळगाव, 3) निधी-कारवार, 4) सुनील-म्हैसूर, 5) विमल-कोडगु.
- 75 किलो गट : 1) प्रताप कालकुंद्रीकर-बेळगाव, 2) राम बेळगावकर-बेळगाव, 3) शरत जयपाल-तुमकूर, 4) टी. संजयकुमार-बेंगळूर, 5) मंजुनाथ कोल्हापुरे-बेळगाव.
- 80 किलो गट : 1) अफरोज ताशिलदार-बेळगाव, 2) राजू एस.एन.-चिक्कमंगळूर, 3) काशिनाथ नायकर-धारवाड, 4) गिरीश-म्हैसूर.
- 85 किलो गट : 1) रामा सोमशेखर-बेंगळूर, 2) सय्यद जमीलसाब-बेंगळूर, 3) मंजू-शिमोगा, 4) हणमेंद्र-रामनगर.
- 85 किलो वरील गट : 1) चरणराज-उडपी, 2) सत्यानंतर भट्ट-म्हैसूर, 3) मनोज अर्स-चित्रदुर्ग यांनी आपापल्यागटात विजेतेपद पटकाविले.
वज्रदेही किताबासासाठी सुरज भंडारी, शशिधर नाईक, सुरज आचार्य, सुनील भातकांडे, प्रताप कालकुंद्रीकर, अफरोज ताशिलदार, रामा सोमशेखर, चरणराज यांच्यात लढत झाली. त्यानंतर प्रताप कालकुंद्रीकर, रामा सोमशेखर व चरणराज यांच्यात तुलनात्मक लढत झाली. यामध्ये बाजी मारत आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर उडपीच्या चरणराजने वज्रदेही चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन हा मानाचा किताब पटकाविला. तर पहिले विजेतेपद बेंगळूरचा रामा सोमशेखर तर बेळगावच्या प्रताप कालकुंद्रीकर दुसऱ्या उपविजेत्यापदावर समाधान मानावे लागले. मान्यवरांच्या हस्ते मानाचा किताब, आकर्षक चषक, रोख रक्कम, प्रमाणपत्र व भेटवस्तु देवून गौरविण्यात आले. तर उत्कृष्ट पोझरचा किताब बेळगावच्या मंजुनाथ कोल्हापुरे यांनी पटकाविला. त्याला मान्यवरांच्या हस्ते चषक व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून गंगाधर एम. जे निलकंठ, जे. डी. भट, उमाकांत व सुनील राऊत यांनी काम पाहिले.









