भोगावती/प्रतिनिधी
Kolhapur News : चाफोडी ता. राधानगरी येथील दगडू सदू पाटील यांच्या मालकीच्या जनावरांच्या गोठ्याला रविवारी भर दुपारी १२ च्या सुमारास उन्हाच्या तडाख्यातच लागलेल्या आगीत साठा केलेली वैरण, लाकडे व अन्य प्रपंचिक साहित्य जळून खाक झाले. यामध्ये पाटील यांचे सुमारे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. गोठ्यातील दोन रेडकांना तातडीने बाहेर काढल्याने त्यांचा जीव वाचला आहे.
शेजारच्या शेतकऱ्याने आपल्या शेतातील कचरा दुपारच्या वेळेत पेटविला होता.त्यामधील ठिणगी उडून ही दुर्दैवी घटना घडली असल्याचे सकृतदर्शनी समजले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. डोंगराच्या बाजूला हा गोठा असल्याने व तेथे जाण्यासाठी चांगला रस्ता नसल्याने अग्निशामक गाडी पोहोचू शकत नव्हती. तरीही तेथील युवकांनी आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही उन्हाच्या तडाख्यामुळे आगीवर नियंत्रण आणण्यास अडचण येत आहे.
गावच्या पश्चिमेला पाटील यांनी जनावरांसाठी गोठा बांधला आहे. त्यामध्ये त्यांनी पावसाळ्यासाठी वैरण,लाकडे व अन्य प्रापंचिक साहित्य गोळा करून ठेवले होते. सुदैवाने त्यांनी तेथे जनावरे बांधलेली नव्हती. आगीत गोठ्याजवळ रचून ठेवलेली पिंजराची व्हळी,लाकूड व पत्र्याचे पूर्ण शेड आणि वैरण व लाकडे जळून खाक झाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









