खानापूर विभागातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार डॉ अंजली निंबाळकर यांचा प्रचार तालुक्यातील चापगांव गावामध्ये करण्यात आला.
घरोघरी जाऊन उमेदवार डॉ अंजली निंबाळकर यांनी मतदारांची भेट घेतली. यावेळी उमेदवार अंजली निंबाळकर यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या व समस्या निवारणाचे आश्वासन दिले.
यावेळी ग्रामस्थांनी उमेदवार डॉ अंजली निंबाळकर यांना आपला पाठिंबा दर्शविला. याप्रसंगी काँग्रेसचे कार्यकर्ते व इतर उपस्थित होते.










