अवजड वाहतूक शहराबाहेर रोखणार
बेळगाव : कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, काँग्रेस नेते राहुल गांधी आदींचा सोमवारी बेळगाव दौरा आहे. या पार्श्वभूमीवर सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत प्रमुख मार्गावरील वाहतूक वळविण्यात येणार आहे. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी ही माहिती दिली आहे. सांबरा विमानतळ रोड, सांबरा अंडरब्रिज, मुचंडी गॅरेज, कनकदास सर्कल, लेक व्ह्यू इस्पितळ, नित्यानंद क्रॉस, सम्राट अशोक चौक, त्रिवेणी हॉटेल, संगोळ्ळी रायण्णा चौक, कोर्ट कंपाऊंड, राणी कित्तूर चन्नम्मा चौक, क्लब रोड, विश्वेश्वरय्यानगर, बाची क्रॉस, सीपीएड मैदान या मार्गावर व्हीआयपींचा वावर असणार आहे. म्हणून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. निपाणी, कोल्हापूर, अथणी, चिकोडी, संकेश्वर, यमकनमर्डी, काकतीहून खानापूर, गोव्याला जाणारी वाहने हिंडाल्को अंडरब्रिजजवळ वळविण्यात येणार असून बॉक्साईट रोड, फॉरेस्ट नाका, हिंडलगा गणेश मंदिर, गांधी सर्कल, शौर्य सर्कल थिमय्या रोड, केंद्रीय विद्यालय क्र. 2, शर्कत पार्क, इंडिपेडंन्स रोड, गवळी गल्ली, फर्नांडिस रोड, नेल्सन रोड, मिलिटरी महादेवमार्गे काँग्रेस रोडवरून पुढे जाऊ शकतात.
बेळगाव शहरातून निपाणी, कोल्हापूर, अथणीकडे जाणारी वाहने कोल्हापूर सर्कल, रामदेव हॉटेल, केएलई इस्पितळमार्गे महामार्गाकडे सोडली जाणार आहेत. हुबळी, धारवाड, बैलहोंगल, सौंदत्ती, हिरेबागेवाडीहून खानापूर व गोव्याकडे जाणारी वाहतूक अलारवाड ब्रिजजवळ वळवून जुना पी. बी. रोड, पॅटसन शोरुम, वैभव हॉटेल, डबल रोड क्रॉस, बँक ऑफ इंडिया, गोवावेस, आरपीडी सर्कलमार्गे तिसऱ्या रेल्वेगेट मार्गे पुढे जातील. हुबळी, धारवाड, बैलहोंगल, सौंदत्ती, हिरेबागेवाडीला जाणारी वाहतूक अलारवाड अंडरब्रिजवरून राष्ट्रीय महामार्गावरून धावतील. वेंगुर्ला, सावंतवाडी, हिंडलगाहून राष्ट्रीय महामार्गाकडे जाणारी वाहतूक फॉरेस्ट नाक्यावरून बॉक्साईट रोड, हिंडाल्को अंडरब्रिजमार्गे वळविण्यात येणार आहे. विजापूर, बागलकोट, नेसरगीहून बेळगावला येणारी वाहतूक मारिहाळ पोलीस ठाण्याजवळ वळविण्यात येणार असून सुळेभावी, खणगाव क्रॉस मार्गे कणबर्गी रोड, कनकदास सर्कल, राष्ट्रीय महामार्ग क्र. 4, निसर्ग ढाब्याजवळ वळून केपीटीसीएल रोडवरून शहरात प्रवेश करतील. सांबरा, नेसरगी, बागलकोट, विजापूरकडे जाणारी वाहने बेळगाव-गोकाक राज्य महामार्गावरून वळविण्यात येणार असून खणगाव क्रॉस, सुळेभावीवरून बागलकोट रोडवर वळविण्यात येणार आहेत. दि. 20 रोजी सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत अवजड वाहतूक शहराबाहेर रोखण्यात येणार आहे.









