प्रतिनिधी/ बेळगाव
लोंढा-मिरज या रेल्वेस्थानकादरम्यान दुपदरीकरणाचे काम सुरू असून, शेडबाळ भागात दुरुस्तीचे काम केले जाणार असल्याने काही रेल्वे रद्द तर काहींच्या मार्गात बदल करण्यात येणार आहे.
तिरुपती-कोल्हापूर एक्स्प्रेस दि. 5 ते 12 एप्रिलपर्यंत बेळगाव ते कोल्हापूर दरम्यान रद्द करण्यात आली असून, बेळगावपर्यंतच धावणार आहे. तर कोल्हापूर-तिरुपती एक्स्प्रेस दि. 6 ते 13 एप्रिल दरम्यान कोल्हापूर ते बेळगावपर्यंत रद्द करण्यात आली आहे. लोंढा-मिरज एक्स्प्रेस दि. 3 ते 11 एप्रिलपर्यंत कुडची ते मिरज दरम्यान रद्द करण्यात आली आहे. मिरज कॅसलरॉक एक्स्प्रेस दि. 3 ते 11 एप्रिलपर्यंत मिरज ते कुडचीदरम्यान रद्द करण्यात आली आहे. याचबरोबर दुरुस्तीचे काम सुरू असल्याने एक्स्प्रेस उशिराने धावणार असल्याचे नैर्त्रुत्य रेल्वेने कळविले आहे.









