बेळगाव : सांगली-मिरज रेल्वेस्थानकांदरम्यान रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचे काम केले जाणार असल्याने मिरज-बेळगाव मार्गावरील वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. रेल्वे क्र. 16589 बेंगळूर-मिरज एक्स्प्रेस दि. 15, 16, 17 व 18 रोजी बेळगाव ते मिरज दरम्यान रद्द करण्यात आली आहे. तर मिरज-बेंगळूर एक्स्प्रेस क्र. 16590 दि. 16, 17, 18 व 19 रोजी मिरज ते बेळगाव दरम्यान रद्द करण्यात आली असल्याने बेळगावमधून धावणार आहे. कोल्हापूर-तिरुपती एक्स्प्रेस दि. 16, 17, 18 व 19 रोजी बेळगावमधून तिरुपतीकडे जाईल. तर तिरुपती-कोल्हापूर एक्स्प्रेस दि. 15, 16, 17 व 18 दरम्यान बेळगावपयर्तिं धावणार आहे. यशवंतपूर-पंढरपूर एक्स्प्रेस दि. 18 रोजी बेळगावपयर्तिं धावणार आहे. पंढरपूर-यशवंतपूर एक्स्प्रेस 19 रोजी बेळगावमधून बेंगळूरच्या दिशेने निघेल. हुबळी-मिरज (17332) एक्स्प्रेस दि. 15, 16, 17, 18 व 19 रोजी शेडबाळपयर्तिं धावणार आहे. मिरज-लोंढा (07351) एक्स्प्रेस दि. 15 ते 19 दरम्यान शेडबाळमधून निघणार आहे. लोंढा-मिरज एक्स्प्रेस दि. 16 ते 19 दरम्यान शेडबाळपयर्तिं धावेल. मिरज-कॅसलरॉक एक्स्प्रेस दि. 16 ते 19 दरम्यान शेडबाळमधून निघणार आहे. कॅसलरॉक-मिरज एक्स्प्रेस दि. 15 ते 18 दरम्यान सांबरा रेल्वेस्थानकापयर्तिं धावेल. तर मिरज-हुबळी एक्स्प्रेस दि. 16 ते 19 दरम्यान सांबरा येथून निघणार आहे.
वेळापत्रकातही बदल
लांबपल्ल्याच्या एक्स्प्रेसच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. बुधवार दि. 17 रोजी निजामुद्दीन-यशवंतपूर (12630), निजामुद्दीन-वास्को, पुद्दुच्चेरी-दादर तर गुरुवार दि. 18 रोजी वास्को-निजामुद्दीन, हुबळी-दादर, दादर-म्हैसूर, जोधपूर-बेंगळूर एक्स्प्रेसच्या मार्गामध्ये बदल करण्यात आला आहे. प्रवाशांना बदललेल्या वेळापत्रकानुसार प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









