जत :
सन २०२५-३० सालातील जत तालुक्यातील ११६ ग्रामपंचायत सरपंचपदाचे फेरआरक्षण सोडत मंगळवारी जाहीर केले. ग्रामपंचायती म्हणजे निम्या ग्रामपंचायतीवर महिलाराज राहणार ५८ आहे. त्यात अनुसूचित जाती महिलांसाठी सात, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी १६ तर खुल्या प्रवर्गात ३५ जागा आरक्षित आहेत. सर्वात मोठे गाव उमदी येथे मात्र जैसे थे अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षण कायम आहे.
तहसिल कार्यालयजवळील तलाठी कार्यालयात सरपंचपदाचे आरक्षण सोडत काढले. प्रांताधिकारी अजितकुमार नष्टे, तहसिलदार प्रविण धानोरकर, अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास, नायब तहसिलदार बाळासाहेब सवदे, अण्णासाहेब धोडमळ, सहा. गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगूळकर यांच्या उपस्थितीत सोडत काढली. जिल्हा परिषद शाळेतील तिसरीची विद्यार्थिनी अवंतिका संजय मानेच्या हस्ते आरक्षण चिठ्या काढण्यात आल्या. ११६ ग्रामपंचायतीपैकी ७० ग्रामपंचायती खुल्या प्रवर्गासाठी होत्या त्यात ३५ ग्रामप ग्रामपंचायतीत महिलांना आरक्षण देण्यात आले. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ३२ ग्रामपंचायती होत्या, त्यात १६ ग्रामपंचायती महिलासाठी आरक्षित केल्या. अनुसूचित जातीसाठी १४ ग्रामपंचायती आरक्षित होत्या. त्यातील सात ग्रामपंचायती महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या.
- या गावात झाले बदल
पांढरेवाडी व लकडेवाडी पूर्वी अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले होते. आता अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित झाले. काराजनगी पूर्वी ओबीसी होते आता खुल्या प्रवर्गासाठी झाले. शेगाव पूर्वी खुल्या प्रवर्गाला आरक्षित होते आता ओबीसीसाठी आरक्षित झाले होते. कोणबगी व कुणीकोनूर हे पूर्वी ओबीसीसाठी आरक्षित होते ते आता खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. बेवनूर पूर्वी खुल्या प्रवर्गात महिलासाठी आरक्षित होते आता खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. हिवरे, करजगी खुल्या प्रवर्गात होते आता खुल्या प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित झाले आहे.
- उमदी एकमेव एस. टी आरक्षण
अनुसूचित जमातीसाठी एकमेव उमदी ग्रामपंचायतीवर आरक्षण पडले.
दरम्यान तालुक्यातील उर्वरित गावांचे आरक्षण पुढीलप्रमाणे, अनुसूचित जाती-तिल्याळ, मोकाशेवाडी, खोजनवाडी, साळम ळगेवाडी, अमृतवाडी, लकडेवाडी धुळकरवाडी,
अनुसूचित जाती महिला आरक्षण-दरिकोनूर, सिद्धनाथ, बाज, भिवर्गी, निगडी बुद्रुक, गुलगुंजनाळ, पांढरेवाडी
इ अनुसूचित जमाती-उमदी इ नागरिकांचा मागास प्रवर्ग-बेळुंखी, बोर्गी बुद्रुक, धावलवाडी, घोलेश्वर, कोसारी, को. बोबलाद, मेंढेगिरी, मोरबगी, सिंदूर, सोनलगी, सुसलाद, तिकोंडी, टोणेवाडी, व्हसपेठ, काराजनगी, शेगाव.
इ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण-अंकले, बागेवाडी, बनाळी, बसर्गी, बिरनाळ, डोर्ली, देवनाळ, गुडडापूर, जाडरबोबलाद, लमाणतांडा दरीबडची, पांडोझरी, संख, तिप्पेहळळी, उंटवाडी, प्रतापूर
इ खुला प्रवर्ग-अचकनहळ्ळी, आसंगी जत, आवंढी, बिळूर, एकुंडी, गोंधळेवाडी, जिरग्याळ, कंठी, काशिलिंगवाडी
कोळगिरी, कुडनूर, कुलाळवाडी, खेराव, खलाटी, लमाणतांडा उटगी, माडग्याळ, माणिकनाळ, मिरवाडमुंचडी, निगडी खुर्द, रेवनाळ, शिंगणहळळी, सोर्डी, शिंगणापूर, उटगी, वजरवाड, वाषाण, वळसंग, येळवी, जाल्याळ खुर्द, कुंभारी, कोणबगी, कुनिकोनूर, बेवनूर, दरीबडची.
इ खुला प्रवर्ग महिला आरक्षण अक्कळवाडी, अंकलगी, अंतराळ, आसंगी तुर्क, बागलवाडी, बालगाव, ग बेळूडगी, बोर्गीखुर्द, गिरगाव, गवाड, गुळवंची, हळळी, हिवरे, जाल्याळ बुद्रुक, कागणरी, करजगी, सालेकिरी पाच्छापूर, रामपूरमल्याळ, रावळगुंडव डी, सनमडी, शेडयाळ, उमराणी, वायफळ, वाळेखिंडी, येळदरी, डफळापूर, लोहगाव, सोन्याळ, करेवाडी को बो, करेवाडी तिकोंडी, खंडनाळ, खिलारवाडी, नवाळवाडी, मोटेवाडी आसंगी तुर्क, लवंगा








