सावंतवाडी प्रतिनिधी
मंगळवार दिनांक १ ऑगस्ट 2023 रोजी आयोजित केलेल्या सावंतवाडी तालुका ज्येष्ठ नागरिक संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या स्थळांमध्ये तांत्रिक अडचणीमुळे बदल करावा लागल्यामुळे, ही सभा त्याच दिवशी सकाळी 11 वाजता संविता आश्रम, अणाव, तालुका कुडाळ यांच्या सभागृहामध्ये आयोजित केलेली आहे. संघाच्या कार्यालयाकडून जाण्या- येण्यासाठी सकाळी दहा वाजता बसची व्यवस्था करण्यात आलेली आहे, याची सर्व सभासद बंधू भगिनींनी नोंद घेऊन सभेला वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









