19 ते 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार काम : काही रेल्वे रद्द, काहींच्या मार्गात बदल
बेळगाव
नैऋत्य रेल्वेतर्फे लोंढा ते गुंजी यादरम्यान रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीचे काम केले जाणार असल्याने दि. 19 ते 26 फेब्रुवारीपर्यंत वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. काही रेल्वे रद्द तर काहींच्या मार्गामध्ये बदल करण्यात आला असून प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मिरज-हुबळी अनारक्षित एक्स्प्रेस दि. 19 ते 27 दरम्यान रद्द करण्यात आली आहे. हुबळी-मिरज एक्स्प्रेस दि. 19 ते 26 पर्यंत, मिरज-कॅसरलॉक रेल्वे दि. 19 ते 26, कॅसरलॉक-मिरज दि. 19 ते 26, हुबळी-दादर एक्स्प्रेस दि. 20 ते 26, दादर-हुबळी एक्स्प्रेस दि. 21 ते 27 फेब्रुवारीपर्यंत रद्द करण्यात आली आहे.
सिकंदराबाद-बेळगाव एक्स्प्रेस दि. 18 ते 25 पर्यंत हुबळी ते बेळगाव दरम्यान रद्द करण्यात आली आहे. ही एक्स्प्रेस धारवाड येथून काही दिवस निघणार आहे. बेळगाव-सिकंदराबाद एक्स्प्रेस दि. 19 ते 26 दरम्यान धारवाडपर्यंत धावणार आहे. मिरज-लोंढा एक्स्प्रेस दि. 19 ते 26 बेळगावपर्यंत धावणार आहे. लेंढा-मिरज एक्स्प्रेस दि. 19 ते 26 पर्यंत बेळगावमधून निघणार आहे.
तिरुपती-कोल्हापूर हरिप्रिया एक्स्प्रेस दि. 21 ते 25 धारवाडपर्यंत धावणार आहे. तर कोल्हापूर-तिरुपती एक्स्प्रेस दि. 22 ते 26 धारवाड येथून निघणार आहे. त्यामुळे कोल्हापूर, मिरज, बेळगाव येथील प्रवाशांना धारवाडपर्यंत पोहोचून तेथून रेल्वे पकडावी लागेल. म्हैसूर-बेळगाव विश्वकर्मा एक्स्प्रेस दि. 21 ते 25 हुबळीपर्यंत धावेल तर बेळगाव-म्हैसूर एक्स्प्रेस दि. 22 ते 26 दरम्यान हुबळी येथून निघणार आहे.
जोधपूर-बेंगळूर एक्स्प्रेस दि. 18 व 23 पर्यंत मिरज, सोलापूरमार्गे हुबळीला वळविण्यात येणार आहे. बेंगळूर-गांधीधाम एक्स्प्रेस दि. 18 व 25 रोजी, बेंगळूर-जोधपूर एक्स्प्रेस दि. 19 रोजी, अजमेर-बेंगळूर दि. 20 रोजी, गांधीधाम-बेंगळूर 21 रोजी, म्हैसूर-अजमेर 21 व 23 रोजी, जोधपूर-बेंगळूर 22 रोजी, बेंगळूर-जोधपूर 22 रोजी, अजमेर-म्हैसूर 24 रोजी, बेंगळूर-अजमेर 24 रोजी सोलापूरमार्गे वळविण्यात येणार आहे. पाँडेचेरी-दादर एक्स्प्रेस 19 रोजी, तिरुवेनवेल्ली-दादर 24 रोजी, म्हैसूर-दादर 19 व 26 रोजी, कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेस दि. 19 व 20 रोजी उशिराने धावणार आहे.









