न्हावेली / वार्ताहर
Change in the time of Tutari Express leaving from Sawantwadi!
कोकण रेल्वेच्या सावंतवाडी रोड स्थानकातून सुटणारी ट्रेन क्र. ११००३ दादर सावंतवाडी रोड अर्थात तुतारी एक्सप्रेसच्या वेळेत ७ एप्रिल पासून बदल करण्यास कोकण रेल्वेने मंजुरी दिली आहे .याबाबतचे प्रसिद्धी पत्रक कोकण रेल्वे बोर्डाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे सध्या ही गाडी सावंतवाडी रोड अर्थात मळगाव स्थानकातून सायंकाळी ७ वाजून १० ( १९ . १० ) मिनिटांनी निघत आहे या वेळेत ७ एप्रिल पासून बदल करण्यात येत असून ती रात्री ८ वाजता ( २०.०० ) निघणार आहे .









