बाहुबली रॉकेट सज्ज : दुपारी 2:35 वाजता प्रक्षेपण, काउंटडाऊन सुरू
वृत्तसंस्था /श्रीहरिकोटा, हैदराबाद
चांद्रयान-3 च्या प्रक्षेपणासाठी आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथे तयारी पूर्ण झाली आहे. अपग्रेडेड बाहुबली रॉकेट म्हणजेच लॉन्च व्हेईकल मार्क-3 (एलव्हीएम-3) चांद्रयान-3 अवकाशात नेण्यासाठी सज्ज आहे. एलव्हीएम-3 चे प्रक्षेपण यश दर 100 टक्के असल्यामुळे इस्रोला या उ•ाणाच्या यशस्वीतेची पूर्ण खात्री आहे. गुऊवारी दुपारी 1.05 वाजता 25:30 तासांचे काउंटडाऊन सुरू झाले. हे प्रक्षेपण शुक्रवारी दुपारी 2:35 वाजता सतीश धवन अंतराळ केंद्रातून होणार आहे. भारताची महत्त्वाकांक्षी ‘चांद्रयान-3’ मोहीम 14 जुलै रोजी आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केली जाण्याची महत्त्वपूर्ण घोषणा गेल्या आठवड्यात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने केली होती. त्यानुसार प्रक्षेपणाची तयारी पूर्ण झाली आहे. शुक्रवारी होणाऱ्या यशस्वी उ•ाणानंतर पुढील 14 दिवस रोव्हर लँडरभोवती 360 अंशात फिरतानाच अनेक चाचण्या करेल. त्यानंतर 23-24 ऑगस्टच्या दरम्यान चांद्रयान चंद्रावर उतरणार आहे. लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर रोव्हरने केलेल्या चाकांच्या खुणांची छायाचित्रे देखील पाठवेल. साहजिकच दीड-दोन महिने इस्रोच्या शास्त्रज्ञांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहेत.
शास्त्रज्ञांकडून तिऊपतीमध्ये मॉडेलसह पूजा
मिशनच्या यशासाठी इस्रोचे शास्त्रज्ञ गुरुवारी आंध्रप्रदेशातील तिऊपती व्यंकटचलपती मंदिरात पोहोचले. शास्त्रज्ञांनी पूजेसाठी चांद्रयान-3 चे लघु मॉडेलही आपल्यासोबत नेले होते. गुरुवारी सकाळी इस्रोच्या शास्त्रज्ञांनी तिऊपती मंदिरात प्रार्थना केली. नंतर छोटे मॉडेल दाखवून ते चांद्रयान-3 असल्याचे सांगितले. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ हेही प्रार्थना करण्यासाठी मंदिरात पोहोचले होते. उ•ाणाच्या सफलतेसाठी त्यांनी ईश्वरचरणी प्रार्थना केली.
भारताच्या उ•ाणाकडे जगाची नजर
चांद्रयान-3 च्या यशस्वी मोहीमेनंतर भारत चंद्रावर राष्ट्रध्वज पाठवणारा केवळ चौथा देश ठरणार नाही तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पोहोचणारा पहिला देशही ठरणार आहे. चांद्रयान-1 दरम्यान चंद्र इम्पॅक्ट प्रोब सोडून इस्रोने पाणी शोधले होते. चांद्रयान-2 चे क्रॅश लँडिंग येथे झाले. आता चांद्रयान-3 च्या उ•ाणाकडेही अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया, चीन या बड्या देशांसह संपूर्ण जगाची नजर भारताच्या यशस्वी उ•ाणाकडे राहणार आहे. ‘चांद्रयान-3’चे लँडर चंद्रावर उतरण्यात यशस्वी झाल्यानंतर भारत असे करणारा चौथा देश ठरेल. याआधी अमेरिका, रशिया आणि चीनने आपले अंतराळ यान चंद्रावर उतरवले आहे. चांद्रयान-2 नंतर चांद्रयान-3 या महिन्यात चंद्राच्या पृष्ठभागावर उपकरणे सुरक्षितपणे उतरवण्यासाठी आणि शोध उपक्रम राबविण्यासाठी प्रक्षेपित होणार आहे. या मोहिमेचे संपूर्ण बजेट 651 कोटी ऊपये आहे. या मोहिमेत भारत चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर उतरवणार आहे. या लँडरसोबत एक रोव्हर असून ते चंद्राच्या पृष्ठभागावर फिरताना तेथे काही प्रयोग करणार आहे. चांद्रयान-3 मोहिमेअंतर्गत चंद्राच्या खडकांच्या वरच्या थरातील थर्मोफिजिकल वैशिष्ट्यो, चंद्रावरील भूकंपांची वारंवारता, तेथील प्लाझ्मा वातावरण आणि रचना यांचा अभ्यास करण्यासाठी उपकरणे पाठवली जाणार असून ह्या मोहिमेत यश मिळण्याची आशा भारताला आहे. इस्रोचे नवीन हेवीलिफ्ट प्रक्षेपण वाहन एलव्हीएम-3 ही मोहीम पार पाडण्यासाठी सज्ज झाले आहे.
‘चांद्रयान-2’च्या चुकांमधून ‘चांद्रयान-3’मध्ये सुधारणा
2019 मध्ये चांद्रयान-2 च्या आंशिक यशानंतर इस्रोने चांद्रयान-3 मधील प्रत्येक संभाव्य त्रुटीचा सामना करण्यासाठी चार वर्षांत सातत्याने विविध चाचण्या घेतल्या. अपयश आल्यास काय होईल आणि त्यावर उपाय किंवा पर्याय काय असू शकतात यावर सखोल अभ्यास केल्यानंतरच ही मोहीम पूर्णत्वाकडे नेण्यात येत असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी दिली. 2019 मध्ये आम्ही सॉफ्ट लँडिंगमध्ये अयशस्वी ठरलो. त्यानंतर अभ्यासाअंती चांद्रयान-2 मोहिमेतील डेटाचे विश्लेषण केल्यानंतर त्याच्या सिम्युलेशनमध्ये काय चूक झाली, कुठे अडचण आली याची कारणे शोधण्यात आली. त्यावेळी प्राप्त झालेले पुरावे आणि फुटेजचे अध्ययन केल्यानंतर आता नवी मोहीम आम्हाला निश्चित यश देईल, असे ते पुढे म्हणाले.









