परूळे । प्रतिनिधी
चिपी सिंधुदुर्ग विमानतळ भूमी बचाव समितीचे अध्यक्ष तथा चिपी माजी ग्रामपंचायत सदस्य ,उद्योजक, चिपी कालवंणवाडी येथील रहिवासी चंद्रवदन (चंदु) बाळकृष्ण आळवे (६५) यांचे बुधवारी पहाटे राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी असा परिवार आहे. चिपी विमानतळ प्रकल्प उभारणीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अल्प मोबदल्यात शासनाने घेऊन त्या ठिकाणी प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आळवे यांनी भूमी बचाव समिती स्थापन करून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी लढा दिला होता .









