महाविकास आघाडीचा उमेदवार नसेल तर आम्ही टिळकांना उमेदवारी देऊ .दादांच्या म्हणण्याप्रमाणे आमचे नेतृत्व विचार करेल. दादांची भूमिका जी आहे ती पक्षाला मान्य आहे. महाविकासआघाडीने आजचं कळवलं तर उद्याचा दिवस बाकी आहे. वेळ आहे उमेदवार बदलता येईल, असं खळबळजनक विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. सध्या राज्यातील पोटनिवडणुकांची रणधुमाळी सरू झाली आहे. त्यातच कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवरून राजकारण सुरू आहे.निवडणूक बिनविरोध करण्याच्या आवाहनानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हंटलं होतं की, जर मुक्ता टिळक यांच्या घरी ही उमेदवारी दिली असती तर बिनविरोध करण्याचा विचार केला असता. त्यांच्या या वक्तव्यानंतर बावनकुळे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले बावनकुळे?
शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांना निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी विनंती करतो. भाजप कुणावर अन्याय करत नाही. महाविकासआघाडीने एक पाऊल मागे घेतले तर दोन्ही मतदारसंघाच्या निवडणुका बिनविरोध करायला तयार आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार नसेल तर आम्ही टिळकांना उमेदवारी देऊ . दादांच्या म्हणण्याप्रमाणे आमचे नेतृत्व विचार करेल. दादांची भूमिका जी आहे ती पक्षाला मान्य आहे. महाविकासआघाडीने आजचं कळवलं तर उद्याचा दिवस बाकी आहे. निश्चित पणे तसा निर्णय घेता येईल. मुक्ताताई असत्या तर प्रश्नच नव्हता, कोणी कोणाला डावलत नाहीये ब्राह्मणांनी तर पक्षासाठी आयुष्य दिलंय. पक्षाने ब्राह्मण समाजाला न्याय दिलाय आणि समाजानेही खूप काही दिलंय. आजही त्यांनी चिंचवड आणि कसब्याला पाठिंबा दिला तर आम्ही तसा विचार करु बापट यांची प्रकृतीदेखील चांगली नाही असेही ते म्हणाले.
Previous Articleशिपाई संजीवदादाकडून शिक्षणाला संजीवनी!
Next Article टायगर सफारीतून आठ लाखांचा महसूल








