Chandrashekhar Bawankule Vs MahaVikasAghadi : शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांची बुद्धी भ्रष्ट केलीयं. शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जादू केली असे दिसते. शरद पवारांनी सांगितलं तर उद्या ते काँग्रेसच्या डायसवर देखील बसतील. उद्धव ठाकरे यांनी आयुष्यातील मोठी चूक केली.ते विचारांशी कॉम्प्रोमाइज करत आहेत अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले,मी संस्कृती विरोधात काहीच बोललो नाही,जे काही बोललो ते खरेच बोललो. आज ते कोल्हापुरात बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
राष्ट्रवादी आणि अजित पवारांवर निशाणा साधताना ते म्हणाले की, अनेक पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. कोणी अधिवेशन सोडून जाते? तर कोणी काय करते? राज्यात काय चाललंय हे तुम्हाला माहितीच आहे.राष्ट्रवादी काँग्रेस यापुढे कधीही सत्तेत येणार नाही असा इशारा यावेळी त्यांनी दिला. गजानन कीर्तीकर यांनी शिवसेना वाढवण्यासाठी संपूर्ण आयुष्य दिलं आहे.मात्र ज्यांनी विचार सोडला त्यांना या गोष्टीचा काहीच फरक पडणार नाही.काँग्रेसचे संविधान स्वीकारणे हे उद्धव ठाकरे यांनी ठरवलं आहे.उद्या बहुमत सिद्ध करायला लावलं तर आम्ही सिद्ध करूआज 164 जण आहेत उद्या 184 होतील, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला.
लव्ह जिहाद संदर्भात बोलताना म्हणाले की,राज्यात 99.99 टक्के हिंदू मुलींना मुस्लिम तरुण प्रेमाच्या ओढत आहेत.प्लॅन करून लव्ह जिहाद प्रकरण वाढत आहेत.पोलिसांचा कोणताही रिपोर्ट घ्या,यात ते उघड होईल असेही स्पष्टीकरण दिले.
अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा- 2024 मध्ये ‘मविआ’ला एकही उमेदवार मिळणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचे भाकित
अफजलखान कबरीभोवतीचे अतिक्रमण 22 तासात जमीनदोस्त झाले या विषयी बोलताना ते म्हणाले की, ज्या ज्या ठिकाणी इतिहासाला बाधा पोहोचते त्या ठिकाणी भाजप महत्त्वाची भूमिका घेईल.गड किल्ले ऐतिहासिक राहिले पाहिजेत,यासाठी ठोस पावले उचलण्याची भूमिका भाजप-शिंदे सरकार घेईल.इतिहासाला बाधा पोहोचत असलेले अतिक्रमण होत असेल तर सर्वच गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी योग्य कारवाई करू असे आश्वासनही त्यांनी दिले.
ठाण्यातील विवियाना माॅलमधील सिनेमागृहात हरहर महादेव चित्रपट बंद पाडताना एका प्रेक्षकाला केलेल्या मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना काल पोलीसांनी अटक केली. यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. तर अनेकांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात भाष्य केले. जितेंद्र आव्हाड यांना काल अटक केली असेल तर त्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांना दिली असेल त्यात चाणक्य म्हणणं काय गरजेचं असा सवाल यावेळी त्यांनी केला. जितेंद्र आव्हाड यांचा इतिहास माहिती आहे का?कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे,त्या ठिकाणी कुणीही असो,आव्हाड यांच्यावर कारवाई केली ती सगळे पुरावे बघून केली असेल.एखाद्या चित्रपटाबाबत आक्षेप असेल तर तो सांगण्याचा वेगळा मार्ग आहे.सेन्सॉर बोर्डाकडे तुम्ही तक्रार करू शकता.पण टॉकीजमध्ये जाऊन मारहाण करणं योग्य नाही.देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना हे खपवून घेतलं जाणार नाही असेही ते म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









