Babalasaheb Thorat : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे.तसेच नाना पटोले यांच्यावरील असणारी नाराजी देखील यानिमित्ताने पुढे आली आहे. दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाळासाहेब थोरातांचे भाजपात स्वागत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब थोरात यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यास त्यांना पक्षात घेणार का? असा प्रश्न त्यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
बाळासाहेब थोरात यांच्या रक्तात काँग्रेस आहे.काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी खूप मोठे काम केले आहे. प्रदेशाध्यक्ष असताना काँग्रेसला त्यांनी सावरले होते.त्यामुळे ते भाजपात प्रवेश करतील, असे मला वाटत नाही, अशी स्पष्टोक्ती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आमचा राजकीय पक्ष आहे.पक्ष वाढविणे हे आमचे कामआहे. बाळासाहेब थोरात असो किंवा अन्य कुणीही असो.जर भाजपात प्रवेश करण्यास इच्छूक असेल तर त्यांचा मान सन्मान ठेवून आम्ही त्यांना प्रवेश देत असतो. पण बाळासाहेब थोरात भाजपात प्रवेश करतील, अशी शक्यता मला वाटत नाही, असेही ते म्हणाले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








