सातारा :
नसा नसात रक्तात शिवसेना भिनलेली, हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा यज्ञकुंड तेवत ठेवणारे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचे पाईक असलेले जिल्हाप्रमुख म्हणून चंद्रकांतदादा जाधव आणि रणजितसिंह भोसले यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे जिह्याला शिवसेनेला दोन हाडाचे सच्चे शिवसैनिक मिळाल्याचा आनंद शिवसैनिकामधून व्यक्त केला जात आहे. जिल्हाप्रमुख म्हणून चंद्रकांतदादा यांना फलटण उपविभाग तर रणजितसिंह भोसले यांना सातारा उपविभाग देण्यात आला आहे.
सातारा जिह्यामध्ये शिवसेनेचे काम निष्ठेने करणारे आणि शिवसेना वाढवणारे म्हणून जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांच्याकडे पाहिले जाते. चंद्रकांत जाधव हे शिवसेनेमध्ये राजकारणात एन्ट्री केली तेव्हापासून आहेत. विद्यार्थी दशेपासून त्यांनी शिवसेनेचा विचार वाढवला, रुजवला आणि अंगीकारला. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारधारेनुसार त्यांनी आपली वाटचाल राजकारणात ठेवली. तब्बल त्यांना तिसऱ्यांदा जिल्हाप्रमुख म्हणून संधी मिळाली आहे. त्यांचे पक्षवाढीचे काम पाहून त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्यासह वरिष्ठांनी फलटण माण-खटाव या उपविभागाचे जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी दिली आहे.
तर रणजितसिंह भोसले यांनी सुद्धा पक्षासाठी वाट्टेल ते केले आहे. त्यांचे वडीलही शिवसेनेचे पदाधिकारी जिल्हाप्रमुख होते. शिवसेनेचे बाळकडू त्यांना त्यांच्या घरातूनच मिळालेले आहे. युवा सेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी जिह्यात युवा सेना अधिक जोमाने वाढवली. पक्ष संघटन कार्यकर्त्यांना बळ देणे सर्वसामान्यांच्या हिताची कामे करणे ही त्यांचे हातोटी आहे.
कोरेगावातून त्यांनी विधानसभेला ही तयारी केली होती. मात्र पक्षासाठी त्यांना त्याग करावा लागला. अशा अनेक बाबी त्यांनी पक्षासाठी केलेले आहेत. त्यांनी पक्षासाठी दिलेल्या योगदानामुळे त्यांची सातारा जिल्हाप्रमुखपदी निवड केली आहे. त्यांच्यामागे युवकांची मोठी फळी आहे. त्यांच्या निवडीमुळे शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.








