फलटण: दलित पँथर चळवळीतून स्वर्गीय चंद्रकांत अहिवळे यांनी ‘जय भिम’ चा नारा बुलंद करीत तालुक्यातील अन्याय अत्याचाराला चोख प्रतिउतर देत पँथर सक्षम केली. त्यामुळेच मला राजकीय ताकद मिळाली. फलटणच्या राजकीय ताकदीमुळेच सत्तेच्या संधी आपणास मिळाल्या असल्याचे केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले सांगितले. तसेच फलटणने राजकीय ताकद दिली नसती तर माझी देशभर ओळख झाली नसती असे बोलताना रामदास आठवले भावूक झाले.
चंद्रकांत अहिवळे यांचे नुकतेच निधन झाले होते. या पाश्र्वभूमीवर फलटण रिपाइंच्या वतीने येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवनासमोर शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आठवले बोलत होते.
यावेळी माजी राज्यमंत्री राजाभाऊ सरोदे, रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी बापू कांबळे, अण्णा वायदंडे, सुनिल सर्वगोड, ऍड. विजय गव्हाळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुभाष शिंदे, भाजपाचे तालुकाध्यक्ष पै. बजरंग गावडे उपस्थित होते.
चंद्रकांत अहिवळे प्रशासकीय सेवेत होते तरी ते माझ्या संपर्कात होते ते विचारवंत होते. अखेरपर्यंत मला त्यांनी सल्ला दिला, प्रेम दिलं त्याचा आदर्श घेऊन पुढील पिढीने समाजाचे काम करावे. बाबासाहेबांचा विचार पुढे न्यावा सर्व धर्म समभावाची शिकवण देणाऱ्या भावनांची कदर करणारी भारतीय संस्कृती जोपासावी असे आवाहनही आठवले यांनी यावेळी केले.
प्रास्ताविक विजय येवले यांनी केले. सूत्रसंचलन संजय निकाळजे यांनी केले. प्रारंभी मान्यवरांनी स्वर्गीय अहिवळे यांच्या प्रतिमेला पुष्प वहावुन अभिवादन केले. शोकसभेस पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली जिह्यातील रिपब्लीक न पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील चळवळीतील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठय़ा संख्मेने उपस्थित होते.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








