Chandrakant Patil : महाराष्ट्रासह केंद्रात 144 ठिकाणी लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार निवडून आलेले नाहीत. पण त्याठिकाणी भाजपचे खासदार निवडून आले. त्या जागांवर अधिक भर देण्यासाठी प्रयत्न केला जातोय. 2024 साली 400 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे प्रयत्न असणार आहेत. महाराष्ट्रातील 16 जागांवर लक्ष केंद्रित केलंय. 16 जागांसाठी 16 मंत्री नेमले आहेत. यासाठी बारामतीत आधी बावनकुळे जातील आणि नंतर निर्मला सीतारामन जातील अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. आज कोल्हापुरात पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी बावनकुळे आणि राज भेट,उद्धव ठाकरे ठाणे मिशन,शहर हद्दवाढ याविषयी चर्चा केली.
यावेळी ते म्हणाले, भाजपाचे प्रदेशाध्याक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसंदर्भात चंद्रकांतदादा म्हणाले, प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. केवळ बारामती नाही तर 16 लोकसभा मतदार संघावर लक्ष केंद्रित केलं आहे. बावनकुळे हे केवळ राज ठाकरे यांना नाही तर अनेक नेत्यांना भेटत आहेत असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
उद्धव ठाकरे यांच्या ‘मिशन ठाणे’ विषयी बोलताना ते म्हणाले, अशा पद्धतीने याआधी सर्व मतदार संघावर उध्दवजींनी लक्ष केंद्रित केले असतं तर हे घडलं नसतं असा टोलाही लगावला.
पुढे बोलताना ते म्हणाले, हद्दवाडीचा निर्णय पुन्हा एकदा समोर आला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना पटवून सांगितले तर हा निर्णय 3 मिनिटांत संपून जाईल. शहरातील नेते आणि ग्रामीण भागातील नागरिक यांनी हातात हात घालून चालले पाहिजे. जर ग्रामीण भागातील नागरिकांना न समजवता निर्णय घेतला तर वाद निर्माण होईल. नागरिकांच्या हाताला काम देणं ही शाहू महाराज यांची भूमिका होती. म्हणूनच शाहू मिलच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहोत. हेरिटेज जागेवर स्मारक करू आणि उरलेल्या जागेवर एखादी कंपनी सुरू करता येईल का ते पाहू असेही ते म्हणाले.
शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत मात्र नियुक्ती पत्र दिलेली नाहीत. असा प्रश्न विचारताच ते म्हणाले, प्राचार्य सगळे आणि प्राध्यापक 2072 अशी मोठी यादी आहे.ज्यांच्या नियुक्तीचा आदेश काढला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









