वेदांत सारखा प्रकल्प कोणामुळे गेला हे सर्वांना समजेल
सांगली : ‘‘जनआक्रोश यात्रा काढून आदित्य ठाकरे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारत आहेत. ते जसजसे रस्त्यावर येतील, तसे वेदांत सारखा प्रकल्प कोणामुळे गेला हे सर्वांना समजेल’’, असे मत उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
सांगली-मिरजेत येथे आज विविध कार्यक्रमांसाठी ते आले असता पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘‘आदित्य ठाकरे सध्या राज्यभर फिरून सरकारबद्दल संभ्रम निर्माण करत आहेत. आदित्य ठाकरे यांची जनआक्रोश यात्रा त्याचाच एक भाग आहे. वेदांत प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याबाबत ते सरकारविषयी दिशाभूल करीत आहेत, मात्र लोकांना आता वास्तव कळत आहे. महाविकास आघाडी सरकारचे ते अपयश आहे. ठाकरे यांच्या यात्रेमुळे ते अधिक उघड होत आहे.’’
हे ही वाचा : पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा









