कोल्हापूर: राज्यसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर आता भाजपाचे लक्ष विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करण्याकडे आहे. सकारात्मक प्रतिसाद आला तर नक्कीच प्रयत्न करु. राज्यसभेला आलेला अनुभव पाहता महाविकास आघाडी योग्य निर्णय घेईल अशी आशा आहे. माझा आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा फोन कायम सुरु असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली. आज कोल्हापुरात अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मविआवर टीकास्त्र सोडले.
पुढे बोलताना ते म्हणाले, माणसाने कोणत्याही गोष्टीचं टेन्शन न घेता काम करत राहिलं पाहिजे. राज्यसभेच्या निवडणुकीचा राज्यातील राजकारणावर मोठा परिणाम झाला आहे. हे बदल आता दिसू लागले. धनंजय महाडिकांना आता खासदार म्हणून बळ मिळाले आहे. कार्यकर्त्यांचा मदतीला ते अर्ध्या रात्री धावून जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातही सत्ताधाऱ्यांनी उन्माद चालवला असून, प्रशासनाची त्यांना साथ आहे. कोणाला उचलून आत टाक, कोणावरही केसेस दाखल कर इथपासून ते राजारामपुरीत दुकानदारांवर जी अतिक्रमणाची कारवाई केली इथपर्यंत सर्व काही सुरू आहे असेही ते म्हणाले.
शरद पवार (Sharad Pawar)यांच्यावर निशाणा साधताना चंद्रकांतदादा म्हणाले, तुम्ही काय पेरता हे लक्षात आलं पाहिजे. गेल्या काही दिवसांमध्ये तपास करणाऱ्या यंत्रणांवर दबाव आणायचं काम सुरू झालंआहे. कारवाई केली तर, तुम्ही घेराव घालणार का? हे चुकीचं आहे. तीन वर्षांपूर्वी एका नेत्याला ईडीची नोटीस आली त्यावेळी हजारोच्या संख्येनं आंदोलन केलं. कशाला ईडी पाहिजे मीच स्वतः ईडीकडे जातो म्हणत हजारो नागरिक गोळा केले. या सगळ्याचा ईडीवर काही परिणाम होणार नाही असा टोलाही लगावला.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








