ओबीसी आरक्षाणासह (OBC Reservation) पुढील निवडणूका घ्या असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला. यानंतर राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तर भाजपाच्या नेत्यांनी हा तर युती सरकारचा विजय असल्याचे म्हटलं आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांनी यावर प्रतीक्रिया देत हा विजय तर मविआमुळे झाला असल्याचे म्हटलं आहे. यावर आता भाजपा प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी टीका केली आहे.ओबीसी राजकीय आरक्षण मिळवण्यासाठी युतीचं सरकार यावं लागलं, आता मविआ श्रेयाचं ढोल पिटवेल असे ट्विट करत निशाणा साधला आहे.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील
सुप्रीम कोर्टातल्या कायदेशीर लढाईतून OBC राजकीय आरक्षण अखेर परत मिळालंय. अर्थात, त्यासाठी मविआ सरकार जाऊन भाजपा-शिवसेना युतीचं सरकार यावं लागलं. आरक्षण नसतं तरी 27 टक्के जागांवर OBC उमेदवार देण्याचं आम्ही ठरवलेलंच होतं. आता आरक्षण आमच्यामुळेच मिळालं, असे ढोल मविआ पिटू लागेल… असे ते म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








